मारुती डिझायरला पछाडत ही कार बनली इंडियन कार ऑफ द इयर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 14:05 IST2017-12-15T14:04:51+5:302017-12-15T14:05:16+5:30
नवी दिल्ली- भारतातल्या ऑटोमोबाइल बाजारात इंडियन कार ऑफ द इयर(ICOTY) हा प्रतिष्ठित पुरस्कारांमधला एक समजला जातो. प्रत्येक वर्षी ICOTY बोर्डाचे सदस्य नव्या वाहनांची चाचणी घेऊन विजेत्या कारची घोषणा करतात.

मारुती डिझायरला पछाडत ही कार बनली इंडियन कार ऑफ द इयर
नवी दिल्ली- भारतातल्या ऑटोमोबाइल बाजारात इंडियन कार ऑफ द इयर(ICOTY) हा प्रतिष्ठित पुरस्कारांमधला एक समजला जातो. प्रत्येक वर्षी ICOTY बोर्डाचे सदस्य नव्या वाहनांची चाचणी घेऊन विजेत्या कारची घोषणा करतात. 2018 या वर्षासाठी नव्या हुंदाई वर्ना या गाडीला इंडियन कार ऑफ द इयर या पुरस्कारासाठी निवडण्यात आलं आहे.
या पुरस्काराच्या शर्यतीत होंडा डब्लू-व्ही, जीप कंपास, मारुती डिझायर, मारुती इग्निस, रेनो कॅप्टर, स्कोडा कोडिएक, टाटा नेक्सन आणि फॉक्स वेगन या कारचा समावेश होता. हुंदाई वर्नाला 118 पॉइंट मिळाले आहेत. तर मारुती डिझायरला 117 पॉइंट आणि जीप कंपासला 87 पॉइंट मिळाले आहेत. हुंदाई वर्ना ही मिड साइज सेडान प्रकारातील कार असून, ती होंडा सिटी आणि मारुती सियाज या कारशी बरोबरी साधते. कंपनीनं नव्या कारमध्ये डिझाइनला अपडेट केलं आहे. कारचा प्रोजेक्टर हेडलँप आणि एलईडी डीआरएल देण्यात आला आहे. यात 16 इंचाचे डायमंड कट एलॉय व्हील बसवण्यात आले आहेत.
नव्या वर्ना कारमध्ये 1.6 लीटरचं पेट्रोल आणि डिझेल इंजिन बसवण्यात आलं आहे. पेट्रोल इंजिन 121 बीएचपी ताकदीचं असून, 151 एनएमचं टार्क तयार करतो. तर डिझेल इंजिन 126 बीएचपीच्या ताकदीमुळे 260 एनएम टॉर्क तयार करतो. दोन्ही इंजिनसोबत तुम्हाला 6 स्पीड युनिटचं मॅन्युअल आणि 6 स्पीड युनिटचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कंपनीनं या कारची सुरुवातीची किंमत 7.99 लाखांच्या घरात ठेवली आहे. तर कारचा टॉप मॉडलची एक्स शोरूम दिल्लीमधील किंमत 12.61 लाख रुपये आहे. परंतु पेट्रोल वाहनांच्या तुलनेत डिझेल वाहनांना जास्त पसंती मिळते.