तुम्ही अशाप्रकारे आरसा सेट करून अपघाताला निमंत्रण तर देत नाही आहात ना....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 02:02 PM2018-09-10T14:02:57+5:302018-09-10T14:05:00+5:30

कार चालविताना चालकाला नेहमी सतर्क रहावे लागते. त्याला चारही दिशांना नजर ठेवावी लागते. मागे पाण्यासाठी त्याला आरशांवर अवलंबून रहावे लागते.

how to set mirrors of your car....accident never happens | तुम्ही अशाप्रकारे आरसा सेट करून अपघाताला निमंत्रण तर देत नाही आहात ना....

तुम्ही अशाप्रकारे आरसा सेट करून अपघाताला निमंत्रण तर देत नाही आहात ना....

googlenewsNext

मुंबई : कार चालविताना चालकाला नेहमी सतर्क रहावे लागते. त्याला चारही दिशांना नजर ठेवावी लागते. मागे पाण्यासाठी त्याला आरशांवर अवलंबून रहावे लागते. हे आरसेच जर चुकीच्या पद्धतीने लावल्यास अपघात होऊ शकतो. योग्य पद्धत कोणती चला पाहूया...

आरशावर नेहमी एक संदेश लिहीलेला असतो, की आरशामध्ये दिसणारी वस्तू प्रत्यक्षापेक्षा जवळ असल्याचे दिसते. तसेच हा आरसा मागचे दृष्यही कमी भागाचे दाखवतो. यामुळे हे आरसे योग्यरित्या सेट केलेले असल्यास चालकाला मागून येणाऱ्या वाहनांचा योग्य अंदाज घेता येतो. आणि हीच चुक बरेचजण करतात. चालक तीन आरशांच्या आधारे मागचा अंदाज घेत असतो.

समोरिल वाहनाला ओव्हरटेक करायची असल्यास किंवा पार्किंग केलेले वाहन बाहेर काढायचे असल्यास हे आरसे लागतातच. ओव्हरटेकवेळी डावीकडे किंवा उजवीकडे वाहन बाहेर काढतो. यावेळी मागून कोणते वाहन येतेय, किती वेगात येतेय याचा अचूक अंदाज घेणे गरजेचे असते. अन्यथा ते वाहन आपल्या वाहनावर आदळते. यासाठी आरसा सेट करताना त्याच्या आतील बाजुला आपल्या कारचा भाग दिसण्यासारखा सेट करणे चुकीचे आहे. या आरशामध्ये आपल्या कारचा भाग दिसता नये. केवळ पाठीमागील रस्ता दिसावा, असा सेट करावा. उजव्या डाव्या बाजुचे दोन्ही आरसे असेच सेट करावेत. 

मधला आरसा बाजुचे दोन्ही आरसे दाखवत नसलेला ठीक मधला भाग दाखवेल असा सेट करावा. म्हणजेच तिनही आरशांची रचना मोबाईलचा जसा पॅनोरमा मोड फोटो कॅप्चर करतो तसा. लक्षात असावे प्रत्येकाच्या उंचीनुसार आरशाची सेटींग बदलत असते. यामुळे जर दुसरा कोणी कार चालवत असेल तर प्रथम आरसे सेट करावेत. 

ब्लाईंड स्पॉट
बऱ्याचदा आरसे सेट करूनही आपल्याला मागून येणारी वाहने दिसत नाहीत. याला ब्लाईंड स्पॉट म्हणतात. या स्पॉटमुळेच बऱ्याचदा अपघात होतात. कार कंपन्या बहिर्वक्र असलेले आरसे वापरतात. परंतू काही वाहनांमध्ये हे आरसे छोटे असतात. यामुळे मागील बाजूचा परिघही कमी परिसराचा दिसतो. अशावेळी काही पैसे खर्च करून ब्लाईंड स्पॉट मिरर घेतलेले योग्य ठरतात. यामुळे मागील भागाचा परिघ रुंदावतो.
 

Web Title: how to set mirrors of your car....accident never happens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.