Hero Xpulse 200T unveiled at eicma 2018 | Hero XPulse 200T बाइकवरुन पडदा उठला, जाणून घ्या बाइकची खासियत!
Hero XPulse 200T बाइकवरुन पडदा उठला, जाणून घ्या बाइकची खासियत!

इटलीच्या मिलान शहरात आयोजित EICMA 2018 मध्ये Hero MotoCorp ने आपली नवीन बाइक XPulse 200T वरुन पडदा उठवला आहे. ही बाइक XPulse 200 सोबत लॉन्च केली जाणार आहे. कंपनीनुसार, Hero XPulse 200T टूरिंगसाठी परफेक्ट बाइक आहे. ही बाइक Xtreme 200 R आणि अॅडवेंचर टूरर एक्सपल्स २०० असलेल्या 200cc प्लॅटफॉर्मवर आधारित कंपनीचं नवं मॉडेल आहे.

हिरो एक्सपल्स २०० टी अनेकबाबत स्टॅंडर्ड एक्सपल्सपेक्षा वेगळी असेल. यात 30mm लोअर ग्राऊंड क्लिअरन्स आणि वेगळी सीट व हॅंडलबार आहे. तसेच यात १७ इंचाचे व्हिल्स आहेत. तर एक्सपल्स २०० मध्ये २१ इंचाचा फ्रंट आणि १८ इंचाचा रिअर व्हिल दिला आहे. एक्सपल्स २०० प्रमाणे २०० टी मध्येही सिंगल चॅनज एबीएस, एलइडी लायटिंग, ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि टर्न बाय टर्न नॅविगेशनसोबतच डिजिटल स्पीडोमीटर मिळेल.

एक्सपल्स २०० टी मध्ये स्टॅंडर्ड एक्सट्रीम २००आर मध्ये असलेलं १९८ सीसी सिंगल सिलेंडर, २ व्हॉल्व इंजिन दिलं आहे. एक्सट्रीम २००आर मध्ये हे इंजिन ८ हजार आरपीएमवर १८ बीएचपी पॉवर आणि ६ हजार ५०० आरपीएमवर १७.१ एनएम टॉर्क जनरेट करतं. कंपनी एक्सपल्स २०० आणि एक्सपल्स २००टी या बाइक २०१९ च्या सुरुवातील लॉन्च करणार आहे. या बाइकची किंमत १ लाख रुपयांच्या जवळपास असू शकते असा अंदाज आहे. 

त्यासोबतच हिरो मोटोकॉर्पने मोटरसायकल शोमध्ये एक्सपल्स २०० टी प्लॅटफॉर्मवर आधारित चार कस्टम बाइक्सची सादर केल्या. या बाइक्समध्ये रेसर कॉन्सेप्ट, डेजर्ट कॉन्सेप्ट, स्क्रॅम्बलर कॉन्सेप्ट आणि फ्लॅट ट्रॅक कॉन्सेप्ट याचा समावेश आहे. 
 


Web Title: Hero Xpulse 200T unveiled at eicma 2018
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.