Super Splendor 125: ऑल ब्लॅक व्हेरिअंटमध्ये लॉन्च होणार Super Splendor 125; टीझरमध्ये दिसली झलक! पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 08:21 PM2022-07-25T20:21:43+5:302022-07-25T20:25:11+5:30

देशातील सर्वात मोठ्या मोटरसायकल आणि स्कूटर निर्माती कंपनी हीरो मोटोकॉर्पनं (Hero Motocorp) दुचाकी मार्केटमध्ये धमाका करण्याची तयारी सुरू केली आहे.

hero all black super splendor 125 to be launched soon teaser release | Super Splendor 125: ऑल ब्लॅक व्हेरिअंटमध्ये लॉन्च होणार Super Splendor 125; टीझरमध्ये दिसली झलक! पाहा...

Super Splendor 125: ऑल ब्लॅक व्हेरिअंटमध्ये लॉन्च होणार Super Splendor 125; टीझरमध्ये दिसली झलक! पाहा...

googlenewsNext

नवी दिल्ली-

देशातील सर्वात मोठ्या मोटरसायकल आणि स्कूटर निर्माती कंपनी हीरो मोटोकॉर्पनं (Hero Motocorp) दुचाकी मार्केटमध्ये धमाका करण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनी आपल्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या Splendor ला नव्या लूकमध्ये सादर करणार आहे. याचं नवं मॉडल १२५ सीसी इंजिनमध्ये येणार आहे. 

लवकरच लॉन्च होण्याची आशा
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार Hero Motocorp लवकरच देशात 125CC ची नवी Super Splendor बाइक लॉन्च करणार आहे. याआधीच्या मॉडलच्या बाबतीत बोलायचं झालं तर Splendor Plus 100 CC, Splendor Ismart 110 CC इंजिनमध्ये बाजारात उपलब्ध आहे. 

इन्स्टाग्रामवर दिली माहिती
हीरो मोटोकॉर्प कंपनीकडून इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात आगामी 125 CC Super Splendor ची एक झलक दाखवण्यात आली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लवकरच नव्या अवतारात एक सुपर कूल साथीदार येणार आहे असं नमूद केलं आहे. यात बाईकच्या इतर फिचर्सबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेल नाही. 

ऑल ब्लॅक व्हेरिअंटमध्ये येणार
नवी 125CC सुपर स्प्लेंडर ऑल ब्लॅक व्हेरिअंटमध्ये येणार आहे. कंपनीकडून याचा एक फोटो प्रदर्शित करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये बोल्ड अँड ब्लॅक असं नमूद करण्यात आलं आहे. यानुसार हीरो सुपर स्प्लेंडर १२५ सीसी बाइक ब्लॅक व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होऊ शकते.

Web Title: hero all black super splendor 125 to be launched soon teaser release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.