दिवाळी गिफ्ट! मुकेश अबानींनी नीता अंबानींना गिफ्ट केली सर्वात महागडी एसयुव्ही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 11:14 AM2023-11-09T11:14:36+5:302023-11-09T11:15:07+5:30

मुकेश अंबानींनी देशातील सर्वात महागडी एसयुव्ही खरेदी केली आहे. ही एसयुव्ही त्यांनी पत्नी नीता अंबानी यांना गिफ्ट केली आहे. ...

Diwali Gift! Mukesh Abani gifted Nita Ambani the most expensive SUV | दिवाळी गिफ्ट! मुकेश अबानींनी नीता अंबानींना गिफ्ट केली सर्वात महागडी एसयुव्ही

दिवाळी गिफ्ट! मुकेश अबानींनी नीता अंबानींना गिफ्ट केली सर्वात महागडी एसयुव्ही

मुकेश अंबानींनी देशातील सर्वात महागडी एसयुव्ही खरेदी केली आहे. ही एसयुव्ही त्यांनी पत्नी नीता अंबानी यांना गिफ्ट केली आहे. नुकतीच ही एसयुव्ही झेड प्लस सुरक्षेच्या गराड्यात मुंबईच्या रस्त्यांवर दिसली आहे. रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज असे या एसयुव्हीचे नाव आहे. 

नीता अंबानींची ही नवीन कार लाल रंगाची आहे. नीता अंबानी यांना भेट दिलेल्या या SUV ची किंमत 10 कोटी रुपये आहे. अंबानींच्या ताफ्यात अनेक कार आहेत. यामध्ये रोल्स रॉयस, बेंटले, लँड रोव्हर रेंज रोव्हर, कॅडिलॅक, टेस्ला, पोर्श, फेरारी, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, लेक्सस, व्होल्वो आणि टोयोटा आदी कंपन्यांच्या कारचा सामावेश आहे. 

रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील अंबानींच्या घराच्या गॅरेजमध्ये 150 हून अधिक वाहने आहेत. या लक्झरी एसयूव्हीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीता अंबानी यांनी बुधवारी स्वदेश स्टोअरचे उद्घाटन केले आहे. या माध्यमातून देशातील हजारो कारागिरांना मदत करण्याचे रिलायन्सचे उद्दिष्ट आहे. 

 मुकेश अंबानी यांच्याकडे रॉल्स रॉयस फँटम ड्रॉपहेड कूपे आधीपासूनच आहे. हिची किंमतही 13 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. मर्सिडीज मायबॅक बेन्ज एस660 गार्ड देखील आहे. ही कार 10 कोटी रुपयांपेक्षाही अधिक किंमतीची असल्याचे बोलले जाते. बीएमडब्ल्यू 760 एलआय सिक्योरिटी (आर्मर्ड) आहे. हिची किंमत 8.50 कोटी रुपये एवढी सांगितली जाते. ही एक बुलेटप्रूफ कार आहे आणि सिक्योरिटीच्या दृष्टीनेही अत्यंत सुरक्षित आहे.  फरारी एसएफ90 स्ट्रॅडेल देखील आहे. जी एक हायब्रिड स्पोर्ट्स कार आहे. 

Web Title: Diwali Gift! Mukesh Abani gifted Nita Ambani the most expensive SUV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.