रम्बलिंग स्ट्रीप्सची संकल्पना व्यापक पण भारतात मात्र ती अनेक रस्त्यांवर गायबच!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 12:00 PM2017-09-19T12:00:00+5:302017-09-19T12:00:00+5:30

रम्बलिंग स्ट्रिप्स ही संकल्पना भारतामध्ये केवळ स्पीड ब्रेकर म्हणून वापरली जात असल्याचे प्रामुख्याने दिसते. वास्तविक ड्रायव्हर्सना केवळ डोळ्यांनी नव्हे तर अन्य स्पर्श संवेदनेनेही संकेत मिळावेत, हा हेतू त्यामागे आहे

The concept of Rumbling Stripes is widespread, but in India it is missing on many roads! | रम्बलिंग स्ट्रीप्सची संकल्पना व्यापक पण भारतात मात्र ती अनेक रस्त्यांवर गायबच!

रम्बलिंग स्ट्रीप्सची संकल्पना व्यापक पण भारतात मात्र ती अनेक रस्त्यांवर गायबच!

Next
ठळक मुद्देभारतात हे स्ट्रिप्स प्रामुख्याने स्पीड ब्रेकर्स वा गतीअवरोधक म्हणून वापरले जात असल्याचे दिसतेविभाजकाऐवजीही याचा वापर केला जातो, त्यामुळे कारचे चाक तेथे जाताच मिळारी संवेदना संकेत देतेरस्त्याच्या कडांनाही अशा प्रकारच्या स्ट्रीप्स वा चौकोनांचे, उंचवट्याचे स्पॉट वा रेषा आखलेल्या असतात

रम्बलिंग स्ट्रिप्स ही रस्त्यांवर विशेष करून महामार्गांवर दिसणारी स्पीडब्रेकरच्या ऐवजी वापरली जाणारी संकल्पना. किमान भारतात तरी या रम्बलिंग स्ट्रिपचा अर्थ अनेक वाहन चालकांना नीटपणे ठाऊकच नसावा. काही ठिकाणी हे रम्बलिंग स्ट्रिप्स संबंधित विभागाकडून बसवण्यात वा पेंट करण्यात येतात. मात्र ते या स्ट्रिप्सचा वापर नेमका कशासाठी करतात, असाच प्रश्न पडावा. रस्त्यावर दुभाजक असणारे चौपदरी रस्त्यांसाठी व दुभाजक नसलेल्या रस्त्यांसाठी दोन्ही ठिकाणी ही संकल्पना वापरण्याची पद्धत आहे, पण ती केवळ गतीअवरोधक म्हणून नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

रस्त्यावर पांढऱ्या रंगाने अनेक प्रकारच्या सांकेतिक खुणा आखल्या जातात, मात्र यामध्ये रंगाची जाडी खूप कमी असते,त्यात केवळ रंगाचा वापर केलेला असतो. त्यातून वाहनचालकांना संकेत देण्याचा केवळ हेतू असतो. रम्बलिंग स्ट्रिपबाबत मात्र केवळ तो हेतूच नव्हे तर तो संकेत चालकाला केवळ डोळ्यांना समजावा असा हेतू नसतो. तर त्याला ड्रायव्हिंग करताना त्याची जाणीव शारिरीकदृष्टीने स्पर्श व धक्क्यातून व्हावी हा ही हेतू असतो. यासाठी हे स्ट्रिप्स बनवण्याच्या पद्धती, त्यात वापरले जाणारे घटक हे वेगळे असतात.

भारतात हे स्ट्रिप्स प्रामुख्याने स्पीड ब्रेकर्स वा गतीअवरोधक म्हणून वापरले जात असल्याचे दिसते. विभाजकाऐवजीही याचा वापर केला जातो, त्यामुळे कारचे चाक तेथे जाताच मिळारी संवेदना संकेत देते, रस्त्याच्या कडांनाही अशा प्रकारच्या स्ट्रीप्स वा चौकोनांचे, उंचवट्याचे स्पॉट वा रेषा आखलेल्या असतात. त्यामुळे वाहन चालकाला त्याच्या वाहन चालवताना काही चूक झाली तर संकेत मिळाला पाहिजे, ही संकल्पना यामागे आहे. स्पीडब्रेकरच्या ऐवजी या स्ट्रिप्सचा वापर करतानाही त्या स्ट्रिपसच्या उंचवट्यांमध्ये काही फरक असतो. प्रथम असणारा पट्ट्याचा भाग हा रस्त्याला आडव्य़ा पद्धतीने आखीव स्ट्रिप्समधून व त्यांना फार उंची नसते, धक्का जोरात बसत नाही, त्याचा कारच्या चाकांना फार धक्का जाणवत नाही, सस्पेंशनलाही त्रास नतो, मात्र नंतरच्या टप्प्यामध्ये असलेल्या स्ट्रिप्स या काहीशा जास्त उंचवट्याच्या असतात.

तुमच्या कारने नेहमीच्या एका उंचवट्यासारख्या गतीअवरोधकावर अकस्मात आदळण्यापेक्षा स्ट्रिप्समुळे कारचा केवळ वेग कमी व नियंत्रणात ठेवता येतो. मात्र एकंदर रम्बल स्ट्रिप या संकल्पनेचा व युरोपात झालेल्या त्यावरील संशोधनाचा विचार केला तर भारतातील रस्त्यांवर या स्ट्रिप्सचा वापर परिपूर्णपणे केलेला नाही. केवळ स्पीड ब्रेकर म्हणून जरी याचा वारपर केलेला असला तरी अनेक कार्स महामार्गावर स्ट्रिप्सवरून भरधाव वेगाने नेल्या जातात. मुळात रस्त्यांवरील या विविध संकेतांचा वापर करायला आपण शिकले पाहिजे, सुरक्षित वाहतुकीसाठी त्याची नक्कीच गरज आहे.

Web Title: The concept of Rumbling Stripes is widespread, but in India it is missing on many roads!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.