डिजिटल चावी, पॅनरॉमिक रनरूफ, ८ गियर अन् बरंच काही... अॅडव्हान्स फिचर्ससह भारतात लॉन्च झाली जबरदस्त कार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 06:25 PM2023-01-17T18:25:18+5:302023-01-17T18:27:11+5:30

भारतीय बाजारात आज BMW नं आपली नवी एसयूव्ही BMW X7 कार अधिकृतरित्या लॉन्च केली आहे.

bmw x7 facelift launched in india price at rs 1 22 crore features and specification | डिजिटल चावी, पॅनरॉमिक रनरूफ, ८ गियर अन् बरंच काही... अॅडव्हान्स फिचर्ससह भारतात लॉन्च झाली जबरदस्त कार! 

डिजिटल चावी, पॅनरॉमिक रनरूफ, ८ गियर अन् बरंच काही... अॅडव्हान्स फिचर्ससह भारतात लॉन्च झाली जबरदस्त कार! 

googlenewsNext

नवी दिल्ली- 

भारतीय बाजारात आज BMW नं आपली नवी एसयूव्ही BMW X7 कार अधिकृतरित्या लॉन्च केली आहे. आकर्षक लूक, दमदार इंजिन क्षमता आणि एकापेक्षा एक जबरदस्त फिचर्ससह भारतीय बाजारपेठेत दाखल झालेल्या कारची सुरुवातीची किंमत १.२२ कोटी रुपये (एक्स-शो रुम) इतकी आहे. या लग्झरी एसयूव्हीला दोन ट्रिममध्ये सादर करण्यात आलं आहे. कंपनीकडून या कारचं उत्पादन स्थानिक पातळीवर म्हणजे भारतातच होणार आहे. चेन्नईस्थित बीएमडब्ल्यूच्या प्लांटमध्ये या कारची निर्मिती केली जाणार आहे. नवी एसयूव्ही लॉन्च होताच कारची बुकिंग देखील सुरू झाली आहे. अधिकृत डिलरशीपच्या माध्यमातून ग्राहकांना ही कार बुक करता येणार आहे. 

कशी आहे BMW X7 एसयूव्ही कार?
BMW X7 कार कंपनीनं पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही पर्यायात उपलब्ध करुन दिली आहे. पेट्रोल व्हेरिअंटमध्ये कंपनीनं ६ सिलिंडर इंजिनचा वापर केला आहे. जी 381hp पावर आणि 520Nm चा टॉर्क जनरेट करते. हे मॉडल अवघ्या ५.८ सेकंदात १०० किमी प्रतितास वेग गाठते. याशिवाय या एसयूव्हीच्या ३ लीटर डिझल इंजिनमध्ये 340hp पावर आणि 700Nm चा टॉर्क जनरेट करते. 

कंपनीच्या दाव्यानुसार या एसयूव्हीचे xDrive40i व्हेरिअंट ११.२९ किमी प्रतिलीटर मायलेज देते. तर xDrive40d व्हेरिअंट १४.३१ किमी प्रतिलीटर मायलेज देते. BMW X7 कारला कंपनीनं तीन रंगात सादर केली आहे. यात मिनिरल व्हाइट, ब्लॅक सफायर आणि कॉर्बन ब्लॅक रंगाचा समावेश आहे. याशिवाय या कारचे दोन एक्सल्यूझीव्ह रंग देखील उपलब्ध आहेत. ज्यात ड्रेविट ग्रे आणि टेंजेनाइट ब्लू रंगाचा समावेश आहे. या एसयूव्हीमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्स देखील देण्यात आले आहेत. 

BMW X7 चे फिचर्स कोणते?
कंपनीनं या कारसाठी डिजिटल चावी (Digital Key) दिली आहे. यात तुम्हाला जर तुमची कार तुमच्या एखाद्या मित्राला चालवण्यासाठी द्यायची असेल तर त्याला चावीची गरज लागणार नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून डिजिटल की ट्रान्सफर करू शकता. एसयूव्हीमध्ये १२.४ इंचाची डिजिटल इन्स्ट्रूमेंट इन्फॉरमेशन डिस्प्ले स्क्रीन आणि १४.९ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आला आहे. 

१४-कलर एम्बीयंट लायटिंग, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनारॉमिक सनरुफ, हेडअप डिस्प्ले, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, व्हाइल असिस्टंट सिस्टम आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंटसारख्या अत्यानुधिक सुविधा कारमध्ये देण्यात आल्या आहेत. कारच्या रिअर सिट्समध्येही बऱ्यापैकी जागा आहे. तीन जण सहज बसू शकतात. ५-झोन कंट्रोलसह ऑटोमॅटिक एअर कंडिशन आणि १७ स्पीकरसह हर्मन कॉर्डनचा सराऊंडेड साऊंड सिस्टम देण्यात आला आहे.  

Web Title: bmw x7 facelift launched in india price at rs 1 22 crore features and specification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.