‘वर्ल्ड टूर’वर निघालेल्या जेफ बेजोस कुटुंबियांची वेरूळसह वाराणसी, आग्रा येथे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 07:08 AM2018-06-25T07:08:35+5:302018-06-25T07:08:39+5:30

जैन, हिंदू अन् बौद्ध संस्कृती घेतली जाणून

A visit to Varanasi, Agra, with the Verul family of Jeff Bezos family headed to 'World Tour' | ‘वर्ल्ड टूर’वर निघालेल्या जेफ बेजोस कुटुंबियांची वेरूळसह वाराणसी, आग्रा येथे भेट

‘वर्ल्ड टूर’वर निघालेल्या जेफ बेजोस कुटुंबियांची वेरूळसह वाराणसी, आग्रा येथे भेट

googlenewsNext

राम शिनगारे / संतोष हिरेमठ  
औरंगाबाद : कुटुंबियांसह ‘वर्ल्ड टूर’वर निघालेली जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती जेफरी प्रेस्टन बेजोस ऊर्फ जेफ बेजोस यांनी वेरूळ लेण्यांच्या माध्यमातून जैन, हिंदू अन् बौद्ध संस्कृतीची परंपरा, माहिती जाणून घेतल्याची माहिती पुरातत्व विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. वेरुळातील तीन लेण्यांची पाहणी करण्याचे नियोजन होते, मात्र वेळ शिल्लक राहिल्यामुळे अतिरिक्त दोन लेण्यांचीही त्यांनी पाहणी केली.
आॅनलाईन शिपिंगमधील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘अ‍ॅमेझॉन डॉट कॉम’चे संस्थापक आणि जगातील श्रीमंतांपैकी एक असलेल्या जेफ बेजोस यांनी शनिवारी (दि.२३) वेरूळ लेण्यांची पाहणी केली. या दौऱ्याची कल्पना पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनाही नव्हती. अतिशय गोपनीय असलेल्या दौºयात जेफ बेजोस यांच्यासोबत अमेरिकन असलेले दोन सुरक्षारक्षक होते, तर मुंबईहून एक सुरक्षा रक्षक मागविण्यात आला होता. औरंगाबाद विमानतळावरून आलेला त्यांच्या गाड्यांचा ताफा थेट लेणीच्या प्रवेशद्वारावर थांबला होता. टूरचे नियोजन करणाºया खाजगी कंपनीने बेजोस कुटुंबियांतील व्यक्ती आणि सुरक्षा रक्षकांचे तिकीट येण्यापूर्वीच काढून ठेवले होते. मुंबईहून मागविलेल्या आलिशान गाड्यांतून त्यांचे कुटुंबीय खाली उतरताच उभ्या असलेल्या एका बसमध्ये बसले. ती बस थेट जैन संस्कृतीची विविध प्रारूपे असलेल्या ३२ आणि ३३ क्रमांकाच्या लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ थांबली. या दोन्ही लेण्यांची पाहणी केल्यानंतर बस थेट हिंदू संस्कृती दर्शविणाºया १५ (विष्णूच्या अवतारांची रुपे ) आणि १६ (कैलास लेणी) क्रमांकाच्या लेणीची पाहणी केली. ‘आधी कळस, मग पाया’ या प्रकारची रचना असलेल्या कैलास लेणीची त्यांनी सर्वाधिक स्तुती केली; मात्र स्वत:हून काही अधिक माहिती विचारली नाही. तेथून बौद्ध संस्कृती दर्शविणाºया १० क्रमांकाच्या लेणीची पाहणी केली. या लेण्यांच्या पाहणीतून त्यांनी तिन्ही धर्मांची संस्कृती, निर्मिती, वैभवशाली परंपरा जाणून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
घटनांचे बारकाईने निरीक्षण
वेरूळ लेण्यांची पाहणी करताना जेफ बेजोस हेच बारकाईने निरीक्षण करीत होते. गाईड सांगत असलेली माहिती ऐकून घेत होते. जेफ बेजोस यांच्या तोंडून आवडलेल्या माहितीवर, कलाकृतीवर ‘ओह अमेझिंग’, ‘आऊटस्टँडिंग’ असे उत्स्फूर्त शब्द निघत होते; मात्र त्यांची पत्नी आणि मुले गाईड देत असलेली माहिती अधूनमधून ऐकत होते. उर्वरित वेळेत त्यांनी छायाचित्र काढण्यालाच प्राधान्य दिले.
चार दिवस भारतात
वर्ल्ड टूरवर निघालेले जेफ बेजोस यांचे कुटुंबीय चार दिवस भारतातील वास्तूंची पाहणी करणार होते. अमेरिकेतून थेट नागपूर येथील विमानतळावर आलेले कुटुंबीय हे औरंगाबादला शनिवारी (दि.२३) पोहोचले. तेथून वाराणसी, नंतर आग्रा येथील ताजमहालाची पाहणी करणार होते. याप्रमाणे त्यांचा भारतात तीन रात्री मुक्काम आणि चार दिवसांचा प्रवास असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
अमेरिकन कंपनीने निवडला गाईड
जेफ बेजोस कुटुंबियांना वेरूळ लेण्यांची माहिती देण्यासाठी टूरचे नियोजन करणाºया ‘ए अ‍ॅण्ड के’ या अमेरिकन कंपनीने गाईडची निवड केली होती. गाईड अलीम कादरी यांना याविषयी विचारले असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला; मात्र त्यांच्याविषयी सोशल साईटस्वरून माहिती घेतली असता, अमेरिकेतून येणाºया ‘व्हीव्हीआयपी’ व्यक्तींना माहिती देण्यासाठी त्यांनाच प्राधान्य देण्यात येत असल्याचे समजले. यापूर्वीही त्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक, चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांसह इतरांना वेरूळ-अजिंठा लेण्यांचे दर्शन घडविले आहे.
शाकाहारी जेवणाला दिले प्राधान्य
जेफ बेजोस कुटुंबियांनी औरंगाबादच्या दौºयात शाकाहारी जेवणास प्राधान्य दिले. शहरातील एका नामांकित हॉटेलमधून त्यांच्यासाठी खास जेवण मागविले होते. बेजोस हे कोणते खाद्यपदार्थ घेतील, याची उत्सुकता होती. बेजोस यांनी शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला. गोपनीयतेमुळे जेवणातील मेनू सांगता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबाद ते वेरूळ लेणी प्रवासात त्यांनी सोबत सँडविच घेतले होते, तसेच प्रवासादरम्यान त्यांनी त्यांच्या खाजगी विमानातील पाण्याच्या बॉटल सोबत घेतल्या होत्या.

Web Title: A visit to Varanasi, Agra, with the Verul family of Jeff Bezos family headed to 'World Tour'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.