आज जिल्हा ग्रंथालय संमेलन

By Admin | Published: March 29, 2016 11:47 PM2016-03-29T23:47:40+5:302016-03-29T23:54:15+5:30

नांदेड : जिल्हा ग्रंथालय संघाचे उद्या ३० मार्च रोजी विजयनगर येथे जिल्हा ग्रंथालय संमेलन होणार आहे़

Today's District Library Convention | आज जिल्हा ग्रंथालय संमेलन

आज जिल्हा ग्रंथालय संमेलन

googlenewsNext

नांदेड : जिल्हा ग्रंथालय संघाचे उद्या ३० मार्च रोजी विजयनगर येथे जिल्हा ग्रंथालय संमेलन होणार आहे़ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते होणार आहे़
जिल्हा ग्रंथालय संघ आणि विजय वाचनालयाच्यावतीने होणाऱ्या या जिल्हा ग्रंथालय संमेलनात ग्रंथालय आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणींवर चर्चा केली जाणार असल्याचे जिल्हा गं्रथालय संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ गंगाधर पटने यांनी सांगितले़ प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर शफी अहमद कुरेशी, मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ त्र्यंबकदास झंवर, माजी खासदार डॉ़ व्यंकटेश काब्दे, शिक्षण सभापती संजय बेळगे, सहायक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ग्रंथमित्र भास्कर आर्वीकर यांची उपस्थिती राहणार आहे़ ग्रंथालय पदाधिकारी, कर्मचारी, ग्रंथप्रेमींनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष अ‍ॅड़ शिवाजीराव हाके आणि जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी केले़ (प्रतिनिधी)

Web Title: Today's District Library Convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.