उद्योजक निर्मितीची पायाभरणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:17 AM2018-08-14T01:17:51+5:302018-08-14T01:19:39+5:30

विद्यार्थी, प्राध्यापकांच्या संशोधनाला प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रुपांतरित करणाऱ्या प्रक्रियेचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घालण्यात येत आहे. भविष्यातील उद्योजक निर्मितीचा कारखाना बनविण्यात महत्त्वाचा वाटा उचलणार असलेल्या विद्यापीठातील बजाज इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन मंगळवारी (दि.१४) थाटात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Starting the foundation for entrepreneur creation | उद्योजक निर्मितीची पायाभरणी सुरू

उद्योजक निर्मितीची पायाभरणी सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विद्यार्थी, प्राध्यापकांच्या संशोधनाला प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रुपांतरित करणाऱ्या प्रक्रियेचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घालण्यात येत आहे. भविष्यातील उद्योजक निर्मितीचा कारखाना बनविण्यात महत्त्वाचा वाटा उचलणार असलेल्या विद्यापीठातील बजाज इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन मंगळवारी (दि.१४) थाटात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठात बजाज उद्योग समूहाने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) इन्क्युबेशन सेंटर उभारण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून तब्बल दहा हजार स्क्वेअर फुटांवर इन्क्युबेशन सेंटरचा तळमजला उभारण्यात आला आहे.
या पहिल्या टप्प्यातील सेंटरचे लोकार्पण बजाज आॅटो लिमिटेडचे कार्यकारी संचालक प्रदीप श्रीवास्तव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी बजाज सीएसआरचे सल्लागार सी. पी. त्रिपाठी, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे आणि समन्वयक डॉ. एम. डी. शिरसाट उपस्थित राहणार आहेत. हा उद्घाटन सोहळा मंगळवारी (दि.१४) सकाळी ११.३० वाजता सिफार्ट सभागृहात होणार आहे. देशातील राज्य विद्यापीठांमध्ये इन्क्युबेशन सेंटर उभारणारे हे विद्यापीठ एकमेव आहे. राज्यातील एकाही विद्यापीठामध्ये इन्क्युबेशन सेंटर नसल्याचा दावाही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. २०१४ साली पहिल्यांदा इन्क्युबेशन सेंटरची उभारणी करण्याविषयी बजाज उद्योग समूहाचे राहुल बजाज यांच्याशी चर्चा झाली होती. यानंतर २०१५ मध्ये कंपनीने हा प्रस्ताव मान्य करून निधी देण्यास मंजुरी दिली. यानुसार पहिल्या टप्प्यात कंपनीने दीड कोटी रुपयांचा निधी दिला. यात पाच मजली इन्क्युबेशन सेंटरमधील तळमजल्याचे बांधकाम करण्यात आले. यात एकूण २५ कंपन्यांना उपयोगी असणारे संशोधन करता येईल. अशा पाच मजल्याची उभारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक मजल्यावर २५ प्रमाणे १२५ प्राध्यापक, विद्यार्थी आणि संशोधक एकाच वेळी वेगवेगळ्या गोष्टीत उपयोगी संशोधन करतील, असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर म्हणाले, इन्क्युबेशन सेंटर हा तंत्रज्ञान निर्मितीचे उगमस्थान असणार आहे. याठिकाणी होणारे संशोधन थेट उद्योगांना विकता येईल. यातून उद्योगांची असणारी गरज पूर्ण करता येईल. यावेळी कुलसचिव डॉ. साधना पांडे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, संचालक डॉ. महेंद्र शिरसाट यांची उपस्थिती होती.

Web Title: Starting the foundation for entrepreneur creation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.