एसटीत जाऊन बसला बिबट्या !; सोयगाव आगारात कर्मचा-यांना पळता भुई थोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 11:31 IST2017-12-30T06:05:34+5:302017-12-30T11:31:11+5:30
सोयगाव आगारात उभ्या असलेल्या एका विना दरवाजाच्या एस.टी. बसमध्ये चक्क बिबट्या जाऊन बसला होता.

एसटीत जाऊन बसला बिबट्या !; सोयगाव आगारात कर्मचा-यांना पळता भुई थोडी
ठळक मुद्दे उभ्या असलेल्या एका विना दरवाजाच्या एस.टी. बसमध्ये चक्क बिबट्या जाऊन बसला होता. आगारातील कर्मचारी जमल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली.
सोयगाव (जि. औरंगाबाद) : सोयगाव आगारात उभ्या असलेल्या एका विना दरवाजाच्या एस.टी. बसमध्ये चक्क बिबट्या जाऊन बसला होता. शुक्रवारी पहाटे पाच वाजता बस चालकाने हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांना पळता भुई थोडी झाली.
सोयगाव परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यात सोयगाव बस आगार शहराच्या शेवटच्या टोकावर अजिंठा डोंगर रांगांच्या पायथ्याशी शेतीक्षेत्रात आहे. पहाटे पाच वाजता चालक वसंत पाटील आपली बस ताब्यात घेण्यासाठी आगारात आले. बसमध्ये चढताच त्यांना बिबट्या बस मध्ये आढळल्याने घाम फुटला. यांनतर त्यांनी आरडाओरडा करत आगारातील इतर कर्मचा-यांना बोलावून घेतले. कर्मचारी जमल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली.