एटीएसने अटक केलेल्या संशयिताला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 04:37 PM2019-01-27T16:37:15+5:302019-01-27T16:43:52+5:30

ठाण्यातील मुंब्रा येथील तलाह उर्फ अबु बकार हनीफ पोतरिक (24) याला दहशवाद विरोधी पथकाने अटक केली होती. आज औरंगाबाद येथील न्यायालयात एटीएसने त्याला न्यायालयात हजर केले.

Police custody till February 5 arrested ATS mumbra | एटीएसने अटक केलेल्या संशयिताला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

एटीएसने अटक केलेल्या संशयिताला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

googlenewsNext
ठळक मुद्देठाण्यातील मुंब्रा येथील तलाह उर्फ अबु बकार हनीफ पोतरिक (24) याला  दहशवाद विरोधी पथकाने अटक केली होती. औरंगाबाद येथील न्यायालयात एटीएसने त्याला न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्याला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

औरंगाबाद - ठाण्यातील मुंब्रा येथील तलाह उर्फ अबु बकार हनीफ पोतरिक (24) याला दहशवाद विरोधी पथकाने अटक केली होती. आज औरंगाबाद येथील न्यायालयात एटीएसने त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी  सुनावली आहे. याआधी अटक केलेल्या 9 संशयित आरोपींनी रचलेल्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईनंतर पुन्हा एकदा दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसकडून आणखी एक मोठी कारवाई करत ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून 24 वर्षीय तरुणाला प्रजासत्ताकदिनीच अटक केली.

दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या संशयावरुन तलाहला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तरुणाकडून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क असे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती एटीएस च्या अधिकाऱ्यांनी रविवारी न्यायालयास दिली. यापूर्वी पकडलेल्या आरोपींचा तो प्रमुख साथीदार आहे. रासायनिक स्फोट अथवा विषकांड करून मोठी जीवितहानी करण्याच्या कटात तो सहभागी होता असे समोर आले आहे. दरम्यान, गेल्या  दोन ते चार दिवसांमध्ये एटीएसकडून करण्यात येणाऱ्या कारवायांना यश आल्याचं स्पष्ट होत आहे.

जानेवारीमध्ये होता हल्ल्याचा कट 

संशयितांनी उम्मत ए मोहम्मदिया ही संघटना स्थापन करुन नेटवर्क एकाच विचारधारेचे लोक जमवित होते. या कारवाईने मोठा हल्ला टळल्याचे बोलले जात आहे. घातपाताचा कट उधळण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यंत्रणांपासून पोलीस यंत्रणाही सर्वत्र नजर ठेवून असल्याचं स्पष्ट होत आहे. 

Web Title: Police custody till February 5 arrested ATS mumbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.