Organizing wrestling selection test competition | कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

औरंगाबाद : औरंगाबाद राष्ट्रीय तालीम संघातर्फे ६१ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी ११ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागात निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत वजने होणार असून, त्यानंतर तात्काळ स्पर्धेस प्रारंभ होईल. निवड चाचणीत सहभागी होणाºया मल्लांनी सोबत आधारकार्ड आणणे बंधनकारक आहे. या निवड चाचणीतून पुणे जिल्ह्यातील भुगाव येथे १९ ते २४ डिसेंबदरम्यान रंगणाºया महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मल्लांची निवड करण्यात येणार आहे. या निवड चाचणीत जास्तीत जास्त मल्लांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन तालीम संघाचे अध्यक्ष गुलाबराव देशमुख, सचिव हंसराज डोंगरे, मारुती शिंदे, मंगेश डोंगरे आदींनी केले आहे.