जायकवाडी @ १००% : आवक वाढल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 08:41 PM2017-10-09T20:41:16+5:302017-10-09T20:41:27+5:30

 पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यास परतीच्या पावसाने गेल्या २४ तासात तडाखा दिल्याने तेथील धरण समुहातून मोठ्याप्रमाणात आज सकाळ पासून विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

Jaikwadi @ 100%: Water flow from the dam due to inward growth | जायकवाडी @ १००% : आवक वाढल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग

जायकवाडी @ १००% : आवक वाढल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग

googlenewsNext

औरंगाबाद : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यास परतीच्या पावसाने गेल्या २४ तासात तडाखा दिल्याने तेथील धरण समुहातून मोठ्याप्रमाणात आज सकाळ पासून विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. आज रोजी जायकवाडी धरण १००% भरलेले असल्याने वरील धरणातून येणारी आवक लक्षात घेता आज सायंकाळी ६ वा धरणाचे १० दरवाजे अर्धाफुटाने वर उचलून गोदावरी पात्रात ५२९० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गात रात्रीतून वाढ होण्याची शक्यता धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आज दिवसभर धरणात ९२०० क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती.

वरील धरणातून सोडण्यात आलेले पाणी २६ तासाच्या आत धरणात पोहचणार असल्याने धरणात हे पाणी समावून घेण्यासाठी धरणातील पाणी सोडून पॉकेट तयार करण्यात येत आहे या मुळे जायकवाडीतून नियंत्रित विसर्ग करता येणार आहे असे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

आज सायंकाळी ६.०० वा.धरणाचे द्वार  क्र.१०,१२,१४,१६,१८,१९,२१,२३,२५, व २७ असे एकूण  १० द्वार प्रत्येकी ६ इचांने उचलुन ५२९० क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रातही गेल्या तीन दिवसापासून पाऊस सुरू असल्याने धरणात ९२०० क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. 

नाशिक जिल्ह्यात मुसळधार...

नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासात मुसळधार सुरू असून करंजवन ५५ मि मी, गंगापूर ५२ मि मी, दारणा २२ मि मी, ओझरखेड २५ मिमी, पालखेड ३० मि मी, वाघाड ४० मि मी, पुणेगाव २६ मि मी, तीसगांव २१ मि मी, कच्छपी ५६ मि मी, गौतमी ५३ मि मी, भावली २२ मि मी, ईगतपुरी ७४ मि मी, त्र्यंबकेश्वर ३४ मि मी, विंचूर २३मि मी, घोटी २३ मि मी,  नाशिक १९ मि मी, श्रीरामपूर ३१ मि मी, कन्नड ३१ मि मी, येवला ३५ मि मी, फुंदेवाडी ४० मि मी, शिर्डी २८ मि मी, अशा जबरदस्त पावसाची नोंद झाली यामुळे तेथील धरणातून विसर्ग करण्यात येत आहे.

नाशिक धरणसमुहातील विसर्ग :-

नाशिक जिल्ह्यातील धरणसमुहापैकी दारणा २५०० क्युसेक्स, गंगापूर १७९३ क्युसेक्स, पालखेड ४३७क्युसेक्स, असा मिळुन नांदुर मधमेश्वर वेअर मधुन १०७७९ क्युसेक्स विसर्ग गोदावरीत करण्यात येत आहे. याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ८१५ क्युसेक्स व ओझरवेअर मधुन प्रवरा पात्रात १०९४ क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे हे पाणी गतीने जायकवाडी कडे झेपावले आहे. मंगळवारी दुपारनंतर हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होण्याची शक्यता आहे.

जायकवाडी @ १००%

जायकवाड़ी धरणाची पाणी पातळी 1522.00 फुट झाली असून

 एकूण पाणी साठा:- 2909.041 दलघमी झाला आहे या पैकी

जीवंत पाणी साठा:- 2170.935 दलघमी असून धरणाची टक्केवारी:- 100 % झाली आहे.

तर विसर्ग वाढणार........

जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, कोपरगाव, येवला, शिर्डी, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव आदी भागात पाऊस सुरू असून हे पाणी तात्काळ धरणात दाखल होते या भागात पाऊस वाढल्यास किंवा नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग वाढविल्यास जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवावा लागेल असे कार्यकारी अभियंता चारूदत्त बनसोड यांनी सांगितले.

Web Title: Jaikwadi @ 100%: Water flow from the dam due to inward growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण