निवृत्त फौजदारांसह कारचालक ठार

By Admin | Published: August 11, 2016 01:20 AM2016-08-11T01:20:02+5:302016-08-11T01:26:26+5:30

शेंद्रा फाटा येथे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात निवृत्त फौजदार आणि त्यांचा कारचालक जागीच ठार झाले. तर त्यांची सून आणि दोन नातवंडे गंभीर जखमी झाले.

The driver, including the retired armyman, died | निवृत्त फौजदारांसह कारचालक ठार

निवृत्त फौजदारांसह कारचालक ठार

googlenewsNext

शेंद्रा : जालना रोडवर सतत अपघात घडत असतात. या मार्गावरील शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या शेंद्रा फाटा येथे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात निवृत्त फौजदार आणि त्यांचा कारचालक जागीच ठार झाले. तर त्यांची सून आणि दोन नातवंडे गंभीर जखमी झाले.
निवृत्त फौजदार भाऊराव दगडू खार्डे (६५,रा. रामनगर, जुना जालना) आणि त्यांचा कारचालक शिवाजी दिनकर शिंदे हे या भीषण अपघातात ठार झाले.
चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी सांगितले की, खार्डे हे त्यांची सून शारदा राजू खार्डे (३८), नात सिद्धेश्वरी (१५)आणि नातू प्रथमेश (१२) यांच्यासह मंगळवारी रात्री कारने (क्रमांक एमएच-२१ एएक्स १९१) जालना येथून औरंगाबादकडे येत होते. वेगात जाणारी ही कार शेंद्रा फाट्याजवळ आली असताना विरुद्ध बाजूने येणाऱ्या कारच्या चालकाने (क्रमांक एमएच-२० डीजे ७८०६) शेंद्रा गावाच्या दिशेने दुभाजक ओलांडले. यावेळी वेगात असलेल्या दोन्ही कार अचानक समोरासमोर आल्याने त्यांच्यात भीषण टक्कर झाली.
भाऊराव खार्डे आणि कारचालक शिवाजी शिंदे हे जागीच ठार झाले. तर त्यांची सून आणि नातू, नात हे गंभीर जखमी झाले.
अपघात घडताच दुसरा कारचालक आणि अन्य प्रवासी कार सोडून घटनास्थळावरून पळून गेले. त्यामुळे या घटनेत त्यांना मार लागला अथवा नाही, याबाबतची माहिती समजू शकली नाही. अपघात घडताच जालना रोडवरून जाणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने थांबवली आणि पोलिसांना कळवले.

Web Title: The driver, including the retired armyman, died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.