डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार नऊ जणांना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:21 AM2018-04-18T00:21:39+5:302018-04-18T00:34:45+5:30

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मराठवाड्यातील नऊ जणांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. २०१७-१८ साठीचे हे पुरस्कार आहेत.

Dr. The Babasaheb Ambedkar Samaj Bhushan Award was announced to nine people | डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार नऊ जणांना जाहीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार नऊ जणांना जाहीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मराठवाड्यातील नऊ जणांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. २०१७-१८ साठीचे हे पुरस्कार आहेत.
पुरस्कारासाठी प्रतिव्यक्ती १५ हजार आणि प्रतिसंस्था २५ हजार रुपये अशी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद येथील डॉ. ऋषिकेश भीमराव कांबळे, नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील यादव सीताराम तामगाडगे, लातूर येथील केशव गोरोबा कांबळे, धडकनाळ येथील पंडित केरबा सूर्यवंशी, जळकोट येथील माजीद गफूरसाब मोमीन, परभणी येथील भीमराव नागराव हत्तीअंबिरे, हिंगोली येथील साहेबराव कामाजीराव कांबळे, औंढा येथील सूरजितसिंह रामसिंह वाघमारे (ठाकूर) आणि बीड येथील शंकर चन्नापा वीटकर यांचा समावेश आहे. सामाजिक काम करणाºया व्यक्ती, संस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून १९७१-७२ पासून हा पुरस्कार दिला जातो.


दु:खितांचा कैवार घेताना जे राबता आलं, त्याची दखल राजसत्तेनं घेतली, त्याचं एक विलक्षण समाधान आहे. मी भानावर राहून दीन-दुबळे, ओबीसी, एससी,एसटी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी याशिवाय सवर्णांमधील दुबळ्यांसाठीसुद्धा झटत राहावे, अशी प्रेरणा हा पुरस्कार देईल.
-प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, औरंगाबाद

तालुक्यातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून प्रयत्न केले़ याची शासनाने दखल घेतली, याचा आनंद आहे़
-माजीद गफूरसाब मोमीन जळकोट, जि़ लातूर


गेल्या अनेक वर्षांपासून करीत असलेल्या समाजसेवेचे फळ मिळाले, याचा आनंद झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटत आहे.
- साहेबराव कांबळे , हिंगोली

हा सन्मान माझा एकट्याचा नसून, भटक्या विमुक्त चळवळीत काम करणाºया माझ्यासोबतच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे.
- शंकर वीटकर, बीड

या पुरस्कारामुळे नव्याने काम करण्याची ऊर्मी मिळाली असून, यापुढेही समाजाच्या शेवटच्या घटकाच्या उत्कर्षासाठी सतत कार्यरत राहणार आहे़
-भीमराव हत्तीअंबिरे, परभणी

गेली ३५ वर्षे आंबेडकरी चळवळीत आणि धम्म कार्यात आहे़ शासनाकडून त्याची दखल घेतली गेली याचा मनस्वी आनंद आहे़ हा आंबेडकरी चळवळीचा बहुमान आहे़
-केशव गोरोबा कांबळे, लातूर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारामुळे समाजकार्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे.
-पंडित केरबा सूर्यवंशी, धडकनाळ, जि. लातूर

शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठीही प्रयत्न केले. या बरोबरच विविध नाटकांच्या माध्यमातून लोकप्रबोधनाचे काम केले. शासनाने याची दखल घेतल्याचा आनंद आहे.
- यादवराव तामगाडगे, किनवट, जि. नांदेड

गेल्या ३0 वर्षांपासून आंबेडकरी विचारधारेसोबतच समाजसेवेचे काम करीत आहे. त्याच विचारधारेमुळे आज मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार मिळाला.
-सूरजितसिंह ठाकूर, औंढा, जि. हिंगोली

Web Title: Dr. The Babasaheb Ambedkar Samaj Bhushan Award was announced to nine people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.