वंचित शेतक-यांनाही कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:33 AM2018-01-26T00:33:32+5:302018-01-26T00:33:36+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी राज्य शासनाकडे दाखल केलेल्या अर्जात त्रुटी राहिली असे बँकेच्या माहितीत व शेतक-यांनी दाखल केलेल्या अर्जांच्या माहितीत तफावत आढळून आलेले तालुक्यातील ९२८१ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत.

 Disadvantaged farmers also get debt forgiveness | वंचित शेतक-यांनाही कर्जमाफी

वंचित शेतक-यांनाही कर्जमाफी

googlenewsNext

संजय जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी राज्य शासनाकडे दाखल केलेल्या अर्जात त्रुटी राहिली असे बँकेच्या माहितीत व शेतक-यांनी दाखल केलेल्या अर्जांच्या माहितीत तफावत आढळून आलेले तालुक्यातील ९२८१ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. या शेतकºयांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अशा शेतकºयांनी आपल्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी केले आहे.
तालुकास्तरीय अंमलबजावणी समिती
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण तालुक्यातील शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या १८९०० शेतकºयांपैकी ७४४१ शेतकºयांना कर्जमाफी मिळाली असून या शेतकºयांच्या कर्जखात्यात १७ कोटी ३३ लाख ११ हजार ३४९ रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, तालुक्यातील विविध बँकेच्या ९२८१ खातेदारांनी कर्जमाफीसाठी दाखल केलेल्या आॅनलाइन अर्जात काही त्रुटी राहिल्या आहेत. काही अर्जात दाखल केलेली माहिती व बँकेने दाखल केलेल्या माहितीत तफावत आढळून आल्याने या शेतकºयांना कर्जमाफी यादीत स्थान मिळाले नाही.
या शेतकºयांच्या अर्जांची तपासणी करून ते कर्जमाफीच्या निकषात बसतात का नाही, याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीद्वारे असे अर्ज तपासून पुन्हा कर्जमाफी यादी निश्चित करण्यात येणार आहे.
तफावत असलेले बँकनिहाय अर्ज
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक २२६९
पंजाब नँशनल बँक ३०
महाराष्ट्र ग्रामीण बँक १२९
कँनरा बँक १४७
सेंट्रल बँक आॅफ इंडिया ९५४
देना बँक ५०२
बँक आॅफ बडोदा ७८
स्टेट बँक आॅफ इंडिया ३१८५
बँक आॅफ महाराष्ट्र १३९४
आय सी आय सी बँक ५९३

नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही प्रोत्साहन
बँकेकडून कर्ज उचलून या कर्जाची नियमित परतफेड करणाºया तालुक्यातील शेतकºयांनाही कर्जमाफी मिळाली असून या अंतर्गत २८९७ शेतकºयांना ४ कोटी १७ लाख ५९ हजार ६६० रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे. याचबरोबर रूपांतरीत हप्ते पाडून दिलेल्या ८९ शेतकºयांनाही १७ लाख ९२ हजार ९१३ रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे.
च्अर्जदार व बँकेकडील माहितीआधारे ताळमेळ घालून जे अर्जदार पात्र ठरले, त्यांच्या कर्जमाफीसाठी आवश्यक त्या याद्या व रक्कम सर्व बँकांना आॅनलाइन पद्धतीने वितरीत करण्यात आल्या आहेत. परंतु बँकेने पुरविलेल्या कर्जखात्यातील माहितीतील त्रुटी व शेतकºयांच्या अर्जामध्ये असलेल्या अपुºया माहितीमुळे ताळमेळ होऊ शकला नाही, अशा प्रकरणात निकषात बसणारे अर्जदार शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून तालुकास्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. शेतकºयांनी आपल्या बँकेकडे संपर्क साधून अर्ज दुरूस्ती करून घ्यावी. काही अडचण आल्यास सहायक निबंधक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी केले आहे.
४४५५ शेतकºयांना १०० टक्के कर्जमाफी
१८९०० शेतकºयांपैकी १.५ लाख रूपयांच्या आत कर्ज असलेल्या ४४५५ शेतकºयांना १०० टक्के कर्जमाफी मिळाली असून या पोटी १२ कोटी ९७ लाख ५८ हजार ७७६ रूपये या शेतकºयांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यात आले आहेत.

Web Title:  Disadvantaged farmers also get debt forgiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.