जिल्हा परिषद आज मेळघाटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:20 PM2018-01-21T23:20:20+5:302018-01-21T23:22:01+5:30

येत्या मार्च अखेर पर्यत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त (ओडीएस) करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे.

Zilla Parishad today in Melghat! | जिल्हा परिषद आज मेळघाटात!

जिल्हा परिषद आज मेळघाटात!

Next
ठळक मुद्दे‘ओडीएफ’साठी कंबर कसली : तीन दिवस मुक्काम, मुख्यालय पडणार ओस

आॅनलाईन लोकमत
अमरावती : येत्या मार्च अखेर पर्यत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त (ओडीएस) करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. तरीही शौचालयाच्या बांधकामात माघारलेल्या मेळघाटात वरील कामाला गती देण्यासाठी सोमवार, २२ जानेवारीपासून जिल्हा परिषदेचे सर्वच अधिकारी झाडून पुसून मेळघाटात तीन दिवस तळ ठोकरणार आहेत. परिणामी २२ ते २४ जानेवारी पर्यत मुख्यालयासह ,पंचायत समित्यामध्ये शांतता दिसणार आहे. या विशेष मोहिमेत १५० च्या वर अधिकारी व कर्मचारी सहभागी होत आहेत.
येत्या प्रजासत्ताक दिनापर्यत संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचे लक्ष जिल्हा परिषद प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी मागील काही दिवसांत शौचालय बांधकामासाठी झेडपीत बैठकासुद्धा घेण्यात आल्यात. त्यानंतर ओडीएफच्या कामात सर्वाधिक मागे असलेल्यामध्ये धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांचा समावेश आहे. या दोन तालुक्यांतील शौचालय बांधकामातील पिछेहाट लक्षात घेता मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे डेप्युटी सीईओ संजय इंगळे व अन्य अधिकाºयांनी वरील कामांना गती देण्यासाठी ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमात जिल्हा परिषदेमार्फत राबविण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमांतर्गत ओडीएफ मध्ये माधारलेल्या मेळघाटात जिल्हा परिषदेच्या प्रमुखासह अन्य अधिकारी असे जवळपास दिडशे अधिकारी २२ ते २४ जानेवारी दरम्यान आदिवासी क्षेत्रातील विविध गावात मुक्काम करणार आहेत. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्वच्छ भारत मिशनचे डेप्युटी सीईओ संजय इंगळे यांनी नियोजन केले आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत येत्या २६ जानेवारीपर्यंत मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमध्ये जवळपास आठ हजार शौचालय बांधकामाला रात्रंदिवस सुरुवात झाली आहे. त्यानंतरही शौचालयाची कामे पूर्ण झाली नव्हती. ही कामे पूर्ण करण्यासाठी ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमात तीन दिवस आदिवासी पाड्यांमध्ये मुक्कामी राहणार आहेत.
सीईओ किरण कुलकर्णी यांनी मेळघाटच्या धारणी तालुक्यातील ६२ व चिखलदरा तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमध्ये ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ हा उपक्रम ३० डिसेंबरपासून राबविण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात प्रकल्प संचालक के.एम. अहमद, अतिरिक्त सीईओ विनय ठमके, डेप्युटी सीईओ संजय इंगळे, कैलास घोडके, कार्यकारी अभियंता राजेंद्र डोंगरे, संजय येवले, प्रमोद तलवारे, शिक्षणाधिकारी आर.डी तुरणकर, डीएचओ सुरेश असोले, कॅफो रवींद्र येवले व जिल्ह्यातील सर्व बीडीओ अधीक्षक, लेखा विभागातील अधिकारी, आरोग्य, शिक्षण विभागातील अधिकारी, सीडीपीओ, टीएमओ अशा विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी जवळपास सर्व तीन दिवस उद्दिष्टपूर्तीसाठी अविरत झटणार आहे.
विशेष म्हणजे, या उपक्रमात सर्वच अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती कमी राहणार आहे. परिणामी कामासाठी येणाऱ्या नागरीकांनाही तीन दिवस तरी कामकाज करून घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त
मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यातील ११५ ग्रामपंचायतींपैकी ७२ ग्रामपंचायतींमध्ये शौचालयाचे काम पूर्ण झाले. आता २४ जानेवारीपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात ५३ ग्रामपंचायतींमध्ये उर्वरित जवळपास ८ हजार शौचालयांचे बांधकाम तीन दिवसांत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी या दिडशेवर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आहे. यात सीईओ, अ‍ॅडिशनल सीईओ, डेप्युटी सीईओ, सर्व खातेप्रमुख, बीडीओ व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: Zilla Parishad today in Melghat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.