नियतीच्या घातावर मेहनतीने केली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 09:32 PM2017-09-24T21:32:27+5:302017-09-24T21:32:40+5:30

पतीच्या मृत्यूनंतर उघड्यावर आलेल्या संसाराला आपल्या जिद्द व मेहनतीने नवी उभारणी देणाºया तालुक्यातील वसाड येथील सुरेखा हेंबाडे या शेतकरी महिलेच्या यशाला सर्वच सलाम करीत आहेत.

Work hard on the exponent depletion | नियतीच्या घातावर मेहनतीने केली मात

नियतीच्या घातावर मेहनतीने केली मात

Next
ठळक मुद्देसुरेखा हेंबाडेंचा संघर्ष : पतीच्या मृत्यूनंतर केले स्वप्न साकार, अडीच एकर शेतात अपार परिश्रम

मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : पतीच्या मृत्यूनंतर उघड्यावर आलेल्या संसाराला आपल्या जिद्द व मेहनतीने नवी उभारणी देणाºया तालुक्यातील वसाड येथील सुरेखा हेंबाडे या शेतकरी महिलेच्या यशाला सर्वच सलाम करीत आहेत.
नापिकी व कर्जाने त्रस्त असलेल्या पतीचा नियतीने घात केला. त्याच्या पाठोपाठ आपण ही आयुष्य संपवावा, असे वाटले पण नशिबाने साथ दिली. जिद्द, परिश्रमाला यश आले आहे. मुलाप्रमाणेच शेतातील पिकाची ती जोपासना करीत असून त्यातून भरघोस नफा मिळवीत आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील  वसाड येथील अरुण हेंबाडे या शेतकºयाने नापिकी, सावकाराचे कर्ज, बँकेचा वसुलीचा तगादा यामुळे विष प्राषन करून आत्महत्या केली. संसाराचा विचार न करता पतीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने अरुणची पत्नी, दोन मुले उघड्यावर आली. जीवन संघर्ष अर्ध्यावर न सोडता सुरेखाने खडतर लढा दिला.
नियतीशी दोन हात करण्याचा निर्णय घेऊन तीने आपला जीवन लढा कायम ठेवण्याची जिद्द ठेवली. घरातील दोन एकर शेतीत राबणे सुरू केले. कुणाच्याही मदतीची वाट न पाहता मुलगा आशिष व अविनाश  यांनी शिक्षणासह आईला शेतकामात मदत सुरूकेली, गावकºयांनी सुद्धा  तिचा परिस्थितीशी संघर्ष पाहून तिला मदत करण्याचे ठरविले. मात्र सुरेखाने ती मदत स्वीकारली नाही. कधीकाळी तिने दुसºयाच्या शेतात मजुरी करून दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांचे उज्ज्वल भविष्य हेच तिच्या जीवनाचे धेय ठरले आहे.
पतिवियोगाचे दु:ख तर सुरेखाला  आहेच. मात्र, रडत बसायचे सोडून तिने कामासाठी पदर खोचला आहे. यावर्षी सुरेखाने  आपल्या अडीच  एकर शेतात सोयाबीन पेरले असून यावर्षीसुद्धा तिला मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तिचे दोन मुले सतत तिच्यासोबत असतात  अभ्यासासोबत आईला शेतीच्या कामात तिला मदत करतात.

Web Title: Work hard on the exponent depletion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.