विदर्भातील शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 06:55 PM2019-01-10T18:55:40+5:302019-01-10T18:56:11+5:30

पीक नुकसानीमुळे हवालदिल : मदतीला विलंब, लालफितशाहीत अडकल्या फाईली

Wildlife crisis of farmers in Vidarbha | विदर्भातील शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट

विदर्भातील शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट

Next

- गणेश वासनिक

अमरावती : विदर्भात हरीण, नीलगाय, सांबर, चितळ व रानडुकरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, जंगलात हिरवळ, चारा, पाणी नसल्याने या वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये वळविला आहे. हे वन्यप्राणी शेती पिके बेसुमारपणे नष्ट करतात. मात्र,  शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई थातुरमातुर  मिळत आहे.

 
अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा व नागपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी दोन वर्षांपासून आपला मोर्चा शेतीकडे वळविला आहे. कळपाने वास्तव्य करणाºया या वन्यप्राण्यांनी शेतीतील गहू, हरभरा, कपाशी, तूर व सोयाबीन या पिकांवर हल्ला केलेला आहे. विदर्भातजंगलातील गवत, चारा नष्टप्राय झालेले असून तृष्णा भागविण्यासाठी पाण्याची बिकट अवस्था आहे. परिणामी वन्यजीव जंगलाशेजारच्या शेतीत घुसून पिकांची धुळधान करीत असल्याचे वास्तव आहे. वन्यप्राण्यांच्या या संकटामुळे विदर्भातील शेतकरी पुरता हैराण झालेला आहे. सतत चार वर्षांपासून सतत नापिकी आणि यंदा दुष्काळ स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच वन्यप्राण्यांच्या हैदासाने यात भर पडली आहे. शेतातील उभे पिक वन्यप्राणी नष्ट करीत असल्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास विदर्भात शेतकºयांच्या विंवचनेत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.


कुंपनाला वीजप्रवाह
वन्यप्राण्यांपासून शेतीतील पिकांचे नुकसान रोखण्याकरिता शेतकरी शेतीच्या कुंपनाला रात्रीच्या सुमारास वीज प्रवाह सोडतात. परिणामी यात वन्यजीवांचा जीव जातो तर शेतकºयास तुरुंगवारी होते. दोन वर्षांत वीज प्रवाहामुळे ३ वाघ, ५ बिबट व इतर वन्यजीवांना प्राण गमवावा लागला. उंच कुंपण ओलांडून वन्यप्राणी शेतात शिरतात अन् पिके फस्त करतात. 

पीक नुकसानीची मदत अपुरी
रात्रीतून वन्यजीव कमी अधिक प्रमाणात ५ ते ७ हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी करतात. अशावेळी प्रसिद्ध समिती शेतकºयांच्या शेती पीकनुकसानीचा अहवाल तयार करतात. मात्र, शेतकºयांना शेत पीक नुकसानीच्या केवळ ४० टक्के मदत वनविभाग देते. ही मदत एक वर्षानंतर शेतकºयांना मिळत असल्याने शेतकºयांमध्ये रोष निर्माण झाला आहे. हेक्टर होणाºया नुकसानीच्या तुलनेत टप्पा-टप्प्याच्या नुकसानीचे गणित काढून शेतकºयास प्रतिएकर ५ ते ७ हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. परंतु, त्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागते.


निधीचा अभाव 
शेती पीक नुकसानीचे विदर्भात १० हजारांच्यावर प्रकरणे वनविभागाकडे आलेली असून निधीचा वानवा असल्याने शेतकºयांना गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक मदत देण्यात आली नाही. शेत पिक नुकसानीचे प्रकरणे वाढीस लागलेली असताना निधी मिळत नसल्याने शेतकरी संकटात आलेला आहे. परिणामी विदर्भातील वन्यजीवसुद्धा धोक्यात आलेले आहे. कारण निलगायी, हरिण, चितळ, चिंगारा, रानडुक्कर या वन्यप्राण्यांची संख्या जंगल नसलेल्या भागात दुपटीने वाढ झालेली आहे. 

 

वन्यप्राण्यांनी शेती पिकाचे नुकसान केल्यास त्याची नुकसान भरपाईसाठी नियमावली ठरली आहे. त्यानुसारच वनविभाग कार्यवाही करते. नुकसान भरपाईची काही प्रकरणे प्रलंबित असतील तर त्याचा मागोवा घेत संबंधित शेतकºयांना न्याय दिला जाईल.
  - गजेंद्र नरवणे,
   उपवनसंरक्षक, अमरावती

Web Title: Wildlife crisis of farmers in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.