दीड हजार शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:06 PM2018-05-12T22:06:45+5:302018-05-12T22:06:45+5:30

Waiting for one and a half thousand farmers | दीड हजार शेतकरी प्रतीक्षेत

दीड हजार शेतकरी प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्दे४३६ शेतकऱ्यांची हरभरा खरेदी : गोदामात जागा नाही; खरेदीला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : शासनाने विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने मार्चपासून आधारभूत किमतीवर तूर, हरभरा खरेदी सुरू केली. हरभरा विक्रीसाठी १९९८ शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघामध्ये सातबारा देवून नोंदणी केली आहे. यापैकी केवळ ४३६ शेतकऱ्यांचा ५ हजार ३२७ क्विंटल ५० किलो हरभरा मोजण्यात आला. अद्याप १५६५ नोंदणीकृत शेतकरी वेटिंगवर असून, नोंदणीसुद्धा सुरू आहे. दरम्यान, राज्यभरात वेअर हाऊसमध्ये जागा नसल्याने सध्या हरभरा खरेदीला ब्रेक दिल्याचे सांगितले.
नाफेडने आधारभूत किमतीवर ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल भावाने हरभरा खरेदीला सुरुवात करून सदर काम हे विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला दिले. दरम्यानच्या काळात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अल्पदाराने हरभरा खरेदी करून शासनाला विकला. त्याची ओरड झाल्याने सात-बारावरून खरेदी-विक्री संस्थेकडील रजिस्टरवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोलावण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. हरभरा विक्रीकरिता एकूण १९९८ शेतकऱ्यांनी रजिस्टर नोंदी केल्या, तर आॅनलाइनमध्ये याच नोंदी २०४७ झाल्याचे निष्पन्न झाले. २१ मार्चपासून सुरू झालेल्या खरेदीमध्ये सव्वा महिन्यात केवळ ४३३ शेतकऱ्यांचा ५ हजार २९७ क्विंटल ५० किलो हरभरा मोजला गेला. अद्याप १५६५ नोंदणीकृत शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सुरुवातीलाच व्यापारी हरभरा विकून मोकळे झाले, तर शेतकरी वाऱ्यावर आहेत.
शेतकºयांच्या नावाआड व्यापाऱ्यांचाच माल विक्रीला
व्यापाºयांनी शेतकऱ्यांची अडचण पाहून हंगामाच्या सुरुवातीलाच ३ हजार रुपये ते ३ हजार २०० रुपये भावाने गावखेड्यातून हजारो क्विंटल हरभरा खरेदी केला. हाच हरभरा शासनाला ४ हजार ४०० रुपये दराने विकण्याकरिता व्यापारी प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपये देऊन भाडोत्री सात-बारा जोडून नोंदणी करीत असल्याचे चित्र आहे. एकाच सात-बारावर हरभरा, तूर, कपाशी, सोयाबीन, ज्वारी पिकाच्या नोंदी असताना त्याच शेतात १० ते १५ क्विंटल हरभरा होतो तरी कसा, हा प्रश्न चर्चेचा विषय आहे.

वेअर हाऊसमध्ये जागा नसल्याने हरभरा ठेवणार कुठे? वरिष्ठांच्या सूचनेवरून हरभरा खरेदीला तूर्तास ब्रेक दिला आहे. शासनाने वेअर हाऊस उपलब्ध करून दिल्यास जलदगतीने मोजमाप करून हरभरा वेअर हाउसला पाठविण्यात येईल.
- नारायण चरपे, व्यवस्थापक, खरेदी-विक्री संस्था

Web Title: Waiting for one and a half thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.