पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू, एक बचावला, रामापूर, बहिरम येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 07:58 PM2018-09-09T19:58:46+5:302018-09-09T19:58:56+5:30

दोन वेगवेगळ्या घटनांत पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Two people died | पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू, एक बचावला, रामापूर, बहिरम येथील घटना

पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू, एक बचावला, रामापूर, बहिरम येथील घटना

Next

 अमरावती -  दोन वेगवेगळ्या घटनांत पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
अचलपूर तालुक्यांतर्गत येणा-या रामपूर येथे सौरव इंगळे २१ नजीकच्या पूर्णा नदीत पोळ्यानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी घेऊन गेला असता, त्याचा बुडून मृत्यू झाला. पाण्यात बुडाल्याची माहिती कळताच नागरिकांनी धाव घेतली. मात्र, त्याचा तोपर्यंत युवकाचा मृत्यू झाला होता. दुसरी घटना बहिरम येथील काशी तलावात घडली. संजय मोहोळ (३७, रा. गोविंदपूर) असे मृताचे नाव आहे. संजय त्याच्या मित्र दिनेशसोबत रविवारी सकाळी काशी तलावात आंघोळ करण्यासाठी गेला असता, दोघे खोल पाण्यात अडकले. त्यांनी आरडाओरड केली असता, नागरिक तेथे पोहचल्याने त्यांनी दुपट्ट्याच्या सहाय्याने दिनेशला बाहेर काढले, तर दुसºयाला वाचविता आले नाही. दोन्ही मृत्यूच्या घटनेचा सरमसपुरा व शिरजगाव पोलिसांनी पंचनामा केला असून, मर्ग दाखल केला आहे. संजयचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.

Web Title: Two people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.