मर्च्युरी पॉर्इंटवरील वाहतूक ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:23 PM2019-05-13T23:23:19+5:302019-05-13T23:23:36+5:30

इर्विन चौकाजवळील मर्च्युरी पॉर्इंट अपघातप्रवण स्थळावर प्राणहानी झाल्यामुळे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. आता सिमेंट रस्ता पूर्ण झाल्यामुळे तो रस्ता पूर्ववत झाला. मात्र, तेथे पूर्वीप्रमाणेच नियमबाह्य वाहतूक होत असल्यामुळे आणखी एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनचालक सर्रास विरुद्ध दिशेने वाहने दामटत असल्याने अपघाताला आमंत्रण आपसुक मिळत आहे. याकडे वाहतूक पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.

The traffic on the merchant points was 'like' | मर्च्युरी पॉर्इंटवरील वाहतूक ‘जैसे थे’

मर्च्युरी पॉर्इंटवरील वाहतूक ‘जैसे थे’

Next
ठळक मुद्देविरुद्ध दिशेच्या वाहतुकीचा सपाटा : पुन्हा मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : इर्विन चौकाजवळील मर्च्युरी पॉर्इंट अपघातप्रवण स्थळावर प्राणहानी झाल्यामुळे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. आता सिमेंट रस्ता पूर्ण झाल्यामुळे तो रस्ता पूर्ववत झाला. मात्र, तेथे पूर्वीप्रमाणेच नियमबाह्य वाहतूक होत असल्यामुळे आणखी एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनचालक सर्रास विरुद्ध दिशेने वाहने दामटत असल्याने अपघाताला आमंत्रण आपसुक मिळत आहे. याकडे वाहतूक पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.
इर्विन चौकाकडून उड्डाणपुलाकडे जाणाऱ्यांसाठी मर्च्युरी पॉइंटवरून वाहतूक होते. राजापेठकडून उड्डाणपूल मार्गे इर्विन चौकाकडे येण्यासाठीही मर्च्युरी पॉइंटवरून जावे लागते. याशिवाय रेल्वे स्थानकाकडून इर्विन चौकाकडे जाण्यासाठीही मर्च्युरी पॉइंटवरून जावे लागतात. या तिन्ही बाजूंची वाहतूक मर्च्युरी पॉइंटवरून होत असल्याने प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे.
अनेक वाहनचालक इर्विन चौकाकडून जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे जाण्यासाठी विरुद्ध दिशेने भरधाव जातात. याशिवाय रेल्वेस्थानकाकडून जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे जाण्यासाठीही विरुद्ध दिशेनेच वाहतूक सुरू आहे. ही सर्व वाहतूक मर्च्युरी पॉइंटवरून होत असल्याने प्रचंड कोंडी निर्माण होत असल्याचे दररोज पाहायला मिळत आहे. अशाच विचित्र वाहतुकीमुळे मर्च्युरी पॉइंटवर यापूर्वी दोन गंभीर अपघातात दोघांचे बळी गेले.
आतापर्यंत मर्च्युरी पॉइंटवर शेकडो अपघात घडलेत. मात्र, दोन वेगवेगळ्या गंभीर अपघातात दोघांचे जीव गेल्यामुळे हा मार्ग बॅरिकेडद्वारा बंद करण्यात आला होता. त्यातच सिमेंट रोडचे काम सुरू झाले होते. रस्त्याची कामे पूर्ण झाल्यामुळे आता हा मार्ग पूर्ववत करण्यात आला. मात्र, तेथील वाहतूकही पूर्वीप्रमाणेच नियमबाह्य पद्धतीने सुरू झाली आहे.
आणखी एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याकडे वाहतूक शाखेसह सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे.

Web Title: The traffic on the merchant points was 'like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.