सुपर स्पेशालिटी, इर्विन रुग्णालयात समस्यांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:41 AM2019-05-31T00:41:37+5:302019-05-31T00:42:06+5:30

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील समस्यांमुळे रुग्णांना या सेवेचा लाभ संपूर्णपणे मिळत नसल्याचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या भेटीत गुरुवारी उघड झाले. बंद असल्याचे सांगितलेली सोनोग्राफी मशीन मुळात तेथे नाही.

Super Specialty, Hill of Problems at Irvine Hospital | सुपर स्पेशालिटी, इर्विन रुग्णालयात समस्यांचा डोंगर

सुपर स्पेशालिटी, इर्विन रुग्णालयात समस्यांचा डोंगर

googlenewsNext
ठळक मुद्देरावसाहेब शेखावत यांची पत्रपरिषद : यंत्रसामग्री धूळखात, पदांची वानवा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील समस्यांमुळे रुग्णांना या सेवेचा लाभ संपूर्णपणे मिळत नसल्याचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या भेटीत गुरुवारी उघड झाले. बंद असल्याचे सांगितलेली सोनोग्राफी मशीन मुळात तेथे नाही. काही यंत्रे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत, तर कर्मचारी वर्ग अतिशय तोकडा आहे. याबाबत माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत नाराजी व्यक्त केली.
रुग्णालयातील लिफ्ट एक वर्षापासून बंद आहे. आयसीयू, एनआयसीयू, आॅपरेशन थिएटर, डायलिसीस विभागातील वातानुकूलन यंत्रणादेखील बंद असल्याचे पत्रपरिषदेपूर्वी शेखावत यांनी दिलेल्या भेटीदरम्यान निदर्शनास आले. येथे वर्ग-१ च्या अधिकाऱ्याचे १० पैकी १ पद, विषयतज्ज्ञ व वैद्यकीय अधिकाऱ्यांची २६ पैकी १५ पदे, वर्ग-३ ची १०४ पैकी ७४ पदे, चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची १७७ पैकी १४१ पदेच भरली गेली आहेत. १०० खाटांच्या या रुग्णालयात चार व्हील चेअर व स्ट्रेचर आहेत. अशा स्थितीत रुग्णांवर उपचार कसे करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सुपर स्पेशालिटीच्या दुसºया टप्प्यातील इमारतीकरिता २०११-१२ मध्ये २९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. येथे कर्करोग, मेंदू व मज्जारज्जू तसेच हृदयविकारावरील उपचारासाठी तीन विभाग मंजूर झाले. मात्र, तीन वर्षांपासून इमारत व उपचार यंत्रणा धूळखात पडली आहे. वर्ग-३ चे ११ कर्मचारी वगळता, येथे मंजूर ४५३ पैकी तब्बल ४४२ पदे रिक्त आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहाचा फ्रीज बंद आहे. फाटकाला दगड लावले जातात. जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत अनेक डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस करतात, याकडेही लक्ष वेधण्यात आले. पत्रपरिषदेला अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

इर्विनही त्याच पठडीवर
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भेटीतही रावसाहेब शेखावत यांना अनागोंदी कारभार निदर्शनास आला. जळीत वॉर्डात एसी, तर अपघात कक्षाची लिफ्ट बंद आहे. काही वॉर्डांमध्ये सुरक्षाकर्मीच सलाइन लावतात. रुग्णालय परिसरातील १८ पैकी आठ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत. त्यामुळे चोरी, वादविवाद, दारूला उधाण आले आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे रावसाहेब शेखावत म्हणाले.

Web Title: Super Specialty, Hill of Problems at Irvine Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.