त्या' कर्मचाऱ्यांवरील कारवाई शिथिल करावी, श्रीकांत देशपांडे यांचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 08:01 PM2019-04-24T20:01:42+5:302019-04-24T20:02:46+5:30

लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात बुलडाणा येथील मतदान केंद्र क्रमांक १२० वर झालेल्या मतदानाचा डेटा नष्ट झाला.

Shrikant Deshpande write Letter to the Election Officer | त्या' कर्मचाऱ्यांवरील कारवाई शिथिल करावी, श्रीकांत देशपांडे यांचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र

त्या' कर्मचाऱ्यांवरील कारवाई शिथिल करावी, श्रीकांत देशपांडे यांचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र

Next

 अमरावती - लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात बुलडाणा येथील मतदान केंद्र क्रमांक १२० वर झालेल्या मतदानाचा डेटा नष्ट झाला. याप्रकरणी मतदान केंद्रावर कार्यरत चार शिक्षकांवर निलंबनाची कारवाई शिथिल करण्याची मागणी विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे यांनी बुलडाणा जिल्हा निवडणूक अधिकाºयांना केली आहे. 

मतदान केंद्र क्रमांक १२० येथे चार शिक्षक कार्यरत होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मशीन आॅपरेट करताना चुकीचे बटन दाबले गेले. यामुळे मतदान 'डिलीट' झाले. हे तांत्रिक कारण असून, चूक अनवधानाने झाली आहे. तथापि, शिक्षकांना निवडणूक आयोगाद्वारे तातडीने निलंबित करण्यात आले. तंत्रज्ञान हाताळताना झालेल्या चुकीमुळे थेट निलंबन योग्य नाही. त्यांच्यावर झालेली कारवाई शिथिल करावी, असे पत्र विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे यांनी बुलडाण्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निरूपमा डांगे यांना पाठविले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाºयांची भेट घेणार असल्याचे आ. देशपांडे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

Web Title: Shrikant Deshpande write Letter to the Election Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.