शरद पवारांचा नागरी सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:45 PM2017-10-23T22:45:42+5:302017-10-23T22:45:57+5:30

विधिमंडळ आणि संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

Sharad Pawar's civil hospitality | शरद पवारांचा नागरी सत्कार

शरद पवारांचा नागरी सत्कार

googlenewsNext
ठळक मुद्देअलोट गर्दी : मुख्यमंत्र्यांनी मांडला राजकीय प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधिमंडळ आणि संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली खा. पवारांंचा नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, खा. आनंदराव अडसूळ, आ. सुनील देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, आ. रवि राणा, आ. अनिल बोंडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, रिपाइं नेत्या कमलताई गवई, देवीसिंह शेखावत, प्रभाकरराव वैद्य, माजी मंत्री वसुधा देशमुख, अनिल देशमुख, सुभाष ठाकरे, अरुण गुजराथी, मनोहर नाईक, गुलाबराव गावंडे, रमेश बंग, तुकाराम बिरकड, माजी आमदार सुलभा खोडके, आ. प्रकाश गजभिये, भाजप नेत्या निवेदिता चौधरी, संदीप बाजोरिया, माजी खासदार अनंत गुढे, शरद तसरे, राजेंद्र गवई, सुनील वºहाडे, महापालिका आयुक्त हेमंत पवार, किशोर बोरकर, बाबा राठोड, उपमहापौर संध्या टिकले, माधुरी चेंडके, सुरेश देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, प्रकाश साबळे आदी उपस्थित होते. यावेळी आयोजन समितीतर्फे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शरद पवारांना मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल-श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
श्री शिवाजी शिक्षण संस्था, आमदारांच्यावतीनेसुद्धा पवारांचा भला मोठा हार घालून सत्कार केला. मानपत्राचे वाचन विजया डबीर यांनी केले. पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ, रिपाइंचे नेते राजेंद्र गवई, माजी मंत्री वसुधा देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षीय भाषणातून शरद पवारांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख मांडला. पवारांनी मुख्यमंत्री, कृषीमंत्री, संरक्षणमंत्री अशी पदे भूषवित असताना क्रीडा, राजकारण, समाजकारणात आजपर्यंत केलेला प्रवास राज्याच्या इतिहासात स्मरण राहील, असे ते म्हणाले. राष्ट्रगीताने नागरी सत्कार सोहळ्याचा समारोप झाला. जिल्हाभरातून पवारांचे चाहते, जुने जाणते कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती.

Web Title: Sharad Pawar's civil hospitality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.