जिल्हा कचेरीवर एसएफआयचा मोर्चा

By admin | Published: August 29, 2015 12:33 AM2015-08-29T00:33:04+5:302015-08-29T00:33:04+5:30

स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया व डीवायएफआय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिष्यवृत्ती वाचवा शिक्षण वाचवा’...

SFI Front of District Cure | जिल्हा कचेरीवर एसएफआयचा मोर्चा

जिल्हा कचेरीवर एसएफआयचा मोर्चा

Next

मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचे निवेदन
अमरावती : स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया व डीवायएफआय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिष्यवृत्ती वाचवा शिक्षण वाचवा’ ही मागणी घेऊन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नोकर भरती अध्यादेश मागे घेण्यात यावा, बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा याकरिता तालुका पातळीवर एमआयडीसी झोन तयार करावे, बेरोजगारी भत्ता द्यावा, वाढीव विद्यावेतन त्वरित देण्यात यावे, आठवी पास व आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात यावी, आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांच्या विद्यावेतनात एक हजार रुपयाने वाढ करण्यात यावी, विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती देताना त्यामधील अडचणी दूर करुन शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करावी अशा विविध मागण्यांचा समावेश मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. बेरोजगारांवर होत असलेला अन्याय दूर झाला नाही तर आंदोलन छेडू असा इशारा दिला.
यावेळी एसएफआयचे राजगुरु शिंदे, पंकज घेवारे, विशाल शिंदे, अ.मोहसीन अ. हसन, प्रतीक नांदुरकर, गौरव वडाळकर, पवन सोनकुसरे, नितीन अवघड, सुरज लडके, स्वप्निल इखार, सदानंद पंढरपुरे, पंकज मुके, श्याम शिंदे, प्रफुल्ल जवने, पवन कदम , निखील चांदुरे, सुचित कळंबे, अनुप खेरड, ऋषिकेश बोबरे, विक्की मोहोड आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: SFI Front of District Cure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.