सरपंचाच्या पतीविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:16 PM2018-12-15T22:16:39+5:302018-12-15T22:17:01+5:30

तळेगाव दशासर पोलिसांनी शुक्रवारी रात्री तालुक्यातील धोत्रा येथील सरपंचाच्या पतीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला. गावातील युवकाला पूर्वनियोजित कटानुसार वीज खांबावर चढवून त्याला संपविल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती

Sadosh Manashakti's crime against Sarpanch's husband | सरपंचाच्या पतीविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

सरपंचाच्या पतीविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Next
ठळक मुद्देआरोप : वीज खांबावर चढवून युवकाला संपविले

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : तळेगाव दशासर पोलिसांनी शुक्रवारी रात्री तालुक्यातील धोत्रा येथील सरपंचाच्या पतीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला. गावातील युवकाला पूर्वनियोजित कटानुसार वीज खांबावर चढवून त्याला संपविल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती
तक्रारीनुसार, शरद विजय कणसे (३०, रा. धोत्रा) हा सरपंचाचा पती ग्रामपंचायतीशी संबंधित कामे तो करवून घेत होता. ८ डिसेंबरला दुपारी ३ वाजता पंकज अशोक गोंडाणे (२२) याला शरदने वीज खांबावर बल्ब लावायचा असल्याचे सांगून सोबत घेतले. पंकजने शरदला डीबी बंद केली का, असे विचारले असता, बंद करून डीबीला कुलूप लावल्याचे सांगितले. यानंतर पंकज खांबावर चढला. मात्र, वीजप्रवाह सुरूच असल्याने तो खाली पडून जागीच गतप्राण झाला. माझ्या पुतण्याचा शरदने हेतुपुरस्सर बळी घेतल्याची लेखी तक्रार शुक्रवारी सोमेश्वर बापूराव गोंडाणे (४२) यांनी तळेगाव दशासर पोलिसांना दिली. पोलिसांनी भादंविचे कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी पसार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
आरोपीला सोडले?
लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी रात्री ८ वाजता शरद कणसेला ठाण्यात आणले आणि दोन तासांनी मुक्त केल्याचा आरोप सोमेश्वर गोंडाणे यांनी केला.

तक्रारीवरून आरोपी व मृतासोबत काम करणाऱ्या तिघांचे बयाण नोंदविले. वायरमनचा अहवाल अद्याप आलेला नाही. प्रकरणाची चौकशी सुरूच आहे.
- शिवाजी राठोड
पोलीस उपनिरीक्षक

Web Title: Sadosh Manashakti's crime against Sarpanch's husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.