पत्रकार भवनाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:20 PM2017-10-23T22:20:39+5:302017-10-23T22:21:03+5:30

स्थानिक वॉलकट कम्पाऊंडमध्ये उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी थाटात पार पडले.

Reprint of journalist's house | पत्रकार भवनाचे लोकार्पण

पत्रकार भवनाचे लोकार्पण

Next
ठळक मुद्देभूमिपूजन ते उद्घाटन : पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक वॉलकट कम्पाऊंडमध्ये उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी थाटात पार पडले. भूमिपूजन अन् उद्घाटन असा दुहेरी संगम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, हे विशेष.
पत्रकार भवनाच्या लोकार्पणानंतर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रवीण पोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, अनिल बोंडे, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती. महानगर पालिकेचे आयुक्त हेमंत पवार, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, राहुल गडपाले, उद्योजक नरेंद्र भाराणी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, माधवराव अंभोरे, राजेंद्र काळे, विनोद घुईखेडकर, शौकत अली मीर साहेब, महापालिका स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत आदी व्यासपीठावर होते.
पत्रकारिता क्षेत्रात ४० वर्षांपासून अविरत सेवा देणारे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे आणि दिलीप एडतकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विलास मराठे, मनपा आयुक्त हेमंत पवार, माहिती व जनसंपर्क, नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, राहुल गडपाले, उद्योजक नरेंद्र भाराणी यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, लोकशाही सरकार निरंकुश असणे योग्य ठरत नाही म्हणूनच माध्यमांच्या अंकुशाचे महत्त्व मोठे आहे. सरकार माध्यमांना सर्वतोपरी सहकार्य करीत असले तरी त्यामागे निरपेक्ष कर्तव्याची भावना आहे. पत्रकारितेत अनेक बदल झाले असून बदलांच्या आव्हानांचा सामना करीत प्रसार माध्यमे समाजहिताचे कार्य करीत आहे. पत्रकारांच्या अनेक समस्या असून त्या शासन वेळीच सोडवेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अनिल अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय ओडे, त्रिदीप वानखडे, सुरेंद्र चापोरकर, संजय शेंडे, उल्हास मराठे, सुनील धर्माळे, चंदू सोजतिया, मनोहर परिमल, पद्मेश जयस्वाल, सुधीर भारती, संजय बनारसे, चेतन ठाकूर, विवेक दोडके, योगेश देवके, प्रेम कारेगावकर आदींनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Reprint of journalist's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.