श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षपदी यशोमती ठाकूर व चेअरमनपदी मधुसूदन मोहिते- पाटील यांची फेरनिवड

By गणेश वासनिक | Published: April 6, 2024 08:55 PM2024-04-06T20:55:08+5:302024-04-06T20:55:20+5:30

संत गाडगेबाबांनी १९५२ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेमार्फत राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.

Re Selection of Yashomati Thakur as President and Madhusudan Mohite-Patil as Chairman of Sri Gadge Maharaj Mission | श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षपदी यशोमती ठाकूर व चेअरमनपदी मधुसूदन मोहिते- पाटील यांची फेरनिवड

श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षपदी यशोमती ठाकूर व चेअरमनपदी मधुसूदन मोहिते- पाटील यांची फेरनिवड

अमरावती : श्री गाडगे महाराज मिशन मुंबईच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा आ. यशोमती ठाकूर तर चेअरमनपदी मधुसूदन मोहिते- पाटील यांची बहुमताने फेरनिवड झाली. संस्थेच्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठी भिवाळी-वज्रेश्वरी, जि. ठाणे येथे झालेल्या मिशनची सर्वसाधारण सभा पार पडली.

मिशनची नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्ष उत्तमराव देशमुख (अमरावती), सचिव विश्वनाथ नाचवणे (पालघर), सचिन घोंगटे (यवतमाळ), खजिनदार ज्ञानदेव महाकाळ (अमरावती), अशोक पाटील (अहमदनगर) तर सदस्य अश्विनभाई मेहता (मुंबई), रुक्मिणी सातपुते (सोलापूर), चंद्रकांत माने (सातारा), अनिल आवटे (ठाणे), सुनील बायस्कर (नाशिक), चंद्रकला पाचंगे (सोलापूर), अजित टेमकर (अहमदनगर), ललित उजेडे (चंद्रपूर) यांचा समावेश आहे. यापूर्वी माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, अच्युतराव देशमुख, यशवंतराव माने, विश्वनाथ वाघ महाराज यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचे काम पाहिले आहे.

संत गाडगेबाबांनी १९५२ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेमार्फत राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. विशेषतः आदिवासी, भटक्या विमुक्तांसाठी आश्रमशाळा, वसतिगृहे, बालकाश्रम, वृद्धाश्रम, धर्मशाळा, अन्नदान सदावर्त, गोरक्षण इत्यादी उपक्रम राबवले जातात.

Web Title: Re Selection of Yashomati Thakur as President and Madhusudan Mohite-Patil as Chairman of Sri Gadge Maharaj Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.