पुर्नवसित ग्रामस्थाची मेळघाटात पुन्हा धाव, पोटपखेड गेटवर पोलीस व वनकर्मचारी तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 03:03 PM2017-12-09T15:03:37+5:302017-12-09T15:03:47+5:30

मेळघाटामधून अकोट तालुक्यात पुर्नवसित झालेल्या आठ गावातील ग्रामस्थानी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावात परतण्याचा निर्धार केला.

Re-organized grassroots run again in Melghat, police and workforce deployed at Potpakhed Gate | पुर्नवसित ग्रामस्थाची मेळघाटात पुन्हा धाव, पोटपखेड गेटवर पोलीस व वनकर्मचारी तैनात

पुर्नवसित ग्रामस्थाची मेळघाटात पुन्हा धाव, पोटपखेड गेटवर पोलीस व वनकर्मचारी तैनात

Next

- विजय शिंदे

अकोट- मेळघाटामधून अकोट तालुक्यात पुर्नवसित झालेल्या आठ गावातील ग्रामस्थानी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावात परतण्याचा निर्धार केला. मेळघाट मार्गावर असलेल्या केलपाणी या गावात  9 डिसेंबर रोजी  सकाळपासुन सर्व ग्रामस्थ एकत्र झाले आहेत. या ग्रामस्थाची मनधरणी करीता  पोलीस, वनविभाग व महसुल विभागाचा मोठा ताफा पोपटखेड गेटवर तैनात  करण्यात आला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर पुर्नवसित ग्रामस्थानी मेळघाटात पुन्हा परण्याचे हत्यार उपसल्याने अधिवेशनात पुर्नवसित गावाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गाभाक्षेत्रातील अमोना, बारूखेडा, धारगड,सोमठाणा खुर्द, गुल्लरघाट, नागरतास, केलपाणी, सोमठाणा बु. या गावातील ग्रामस्थानी जमीन, रोजगार ,सोई-सुविधा व आरोग्य यंत्रणामुळे होणारे ग्रामस्थांच्या मृत्युचा मुद्दा पुढे करीत  इतर मागण्याकरीता 9 सप्टेबर रोजी मुलाबाळासह प्रशासनाचे बंदी आदेश झुगारत खटकालीचे गेट तोडून मेळघाटात पोहचले होते. त्यावेळी आयुक्त पियुषसिंह,  मुख्य उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी,अकोला जिल्हाधिकारी आस्तिक पाण्डेय, अमरावती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मेळघाटात ग्रामस्थाची 15 तास मनधरणी करून  मागण्याची पुर्तता करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थ परतले होते. 

मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल व आमदाल बच्चु कडू यांनी प्रशासनाला अल्टीमेट देत ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहिले. आंदोलनाची दखल घेत पुर्नवसित ग्रामस्थाचे प्रश्न मार्गी लावण्याकरीता मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस व मुख्यसचिव डॉ.  प्रविण परदेशी सोबत बैठक पार पडली. शासनाने मुलभूत सुविधा करीता तातडीने 10 कोटीचेवर निधी मंजुर केले. परंतु तीन महीने उलटुनही असुविधा जैसे थे असल्याचे पाहता. ग्रामस्थानी मालकीची शेतजमीन व उदरनिर्वाहाचा प्रश्नाने त्रस्त झालेल्या ग्रामस्थानी पुन्हा दिलेल्या अल्टीमेंटनुसार मेळघाटात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार  मुलंबाळ व घर साहित्यासह ग्रामस्थ केलपाणीत एकत्र होत आहेत. आतापर्यंत एक हजाराचेवर आदिवासी बांधव, ग्रामस्थ केलपाणीत पोहचले आहेत. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, उपवनसंरक्षक  गुरूप्रसाद ,उपविभागीय पोलीस अधिकारी गावित, तहसिलदार विश्वनाथ घुगे,अचलपूर एसडीओ व्यकंट राठोड, धारणी एसडीओ विजय राठोड, चिखलदरा तहसिलदार विजय पवार, अचलपूर तहसिलदार निर्भय जैन, अकोट ग्रामीण पोलीस निरिक्षक मिलिंद बाहाकर  अकोला अमरावती जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी,वन व महसुल विभागाचा ताफा हजर आहे. केलपाणीत एकत्र जमा झालेले ग्रामस्थाची  प्रशासनाकडुन समजूत काढण्यात येत असली तरी ग्रामस्थ कोणत्याही क्षणी मेळघाटात चाल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Re-organized grassroots run again in Melghat, police and workforce deployed at Potpakhed Gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.