दर्यापूर ‘प्रबोधन’चा मयूर कदम टॉपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:27 AM2019-06-09T01:27:54+5:302019-06-09T01:28:18+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. यात दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाचा मयूर कदम याने बेस्ट आॅफ फाइव्हमध्ये ९९ टक्के गुण मिळविले.

The peacock step topper of Daryapur 'Prabodhan' is topper | दर्यापूर ‘प्रबोधन’चा मयूर कदम टॉपर

दर्यापूर ‘प्रबोधन’चा मयूर कदम टॉपर

googlenewsNext
ठळक मुद्देओजस कारंजकर द्वितीय : रसिका कानेटकर तृतीय, तर ऋतुजा इसळ ठरली चौथी, प्रणय शर्मा पाचव्यास्थानी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. यात दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाचा मयूर कदम याने बेस्ट आॅफ फाइव्हमध्ये ९९ टक्के गुण मिळविले. त्याने ४९५ गुण प्राप्त करून जिल्ह्यासह विदर्भातून टॉप केले आहे.
अमरावती शहरात भंवरीलाल सामरा हायस्कूलचा ओजस कारंजरकर याने ९८ टक्के मिळवित ४९० गुण प्राप्त केले. तो जिल्ह्यातून दुसरा क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. गोल्डन किड्सची रसिका कानेटकर ही ९९.६ टक्के गुण मिळवून तृतीय स्थानी राहिली. तिने ४८८ गुण प्राप्त केले. मोर्शी येथील शिवाजी शाळेची विद्यार्थिनी ऋतुजा इसळ हिने ४८७ गुण पटकावले. तिने ९७.४० टक्के गुण मिळवले असून, ती चौथ्या क्रमांकावर झळकली तसेच ज्ञानमाता हायस्कूलचा प्रणय शर्मा याने ४८४ गुण मिळवले. ९६.०८ टक्के प्राप्त करुन तो पाचव्या स्थानी आला आहे.
जिल्ह्यात ६८५ शाळांच्या ४१ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४० हजार ५१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २८ हजार ९८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १३४१६ मुले आणि १५५७० मुली उत्तीर्ण झाल्या. त्यांची टक्केवारी अनुक्रमे ६३.६७ व ८०.०९ अशी आहे. गतवर्षी जिल्हाचा दहावीचा निकाल ८६.४९ टक्के एवढा होता. यंदा तो ७१.५५ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत १४.९४ टक्क््यांनी घसरला आहे. स्थानिक होलीक्रॉस हायस्कूलची विद्यार्थिनी संपदा चौधरी हिने ९७.८० टक्के, मोर्शी येथील शिवाजी हायस्कूलची ऋतुजा इसळ हिने ९८.८०, अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्या शाळेची प्राची कहाने हिने ९७.२० टक्के गुण मिळवित यादीत स्थान पटकावले.
 

Web Title: The peacock step topper of Daryapur 'Prabodhan' is topper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.