शस्त्रक्रिया करणारा बोगस डॉक्टर अटकेत

By admin | Published: August 29, 2015 12:24 AM2015-08-29T00:24:30+5:302015-08-29T00:24:30+5:30

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून भातकुली तालुक्यातील आष्टी येथे हाताची शस्त्रक्रिया करणाऱ्या बोगस डॉक्टरला...

Operator bogus doctor detained | शस्त्रक्रिया करणारा बोगस डॉक्टर अटकेत

शस्त्रक्रिया करणारा बोगस डॉक्टर अटकेत

Next

टाकरखेडासंभू : जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून भातकुली तालुक्यातील आष्टी येथे हाताची शस्त्रक्रिया करणाऱ्या बोगस डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव सुदीप विभूती विश्वास (रा. तारखेडा, भाजीबाजार) असे आहे.
अनकवाडी येथील सरस्वती वासुदेव खर्चान ही महिला आष्टी येथील गजानन राणे यांच्या घरी पाहुणपणासाठी आली होती. त्यांच्या डाव्या हाताला गाठ असल्याने गावातील काही डॉक्टरांच्या सांगण्यावरुन सदर महिलेने सुदीप विश्वास यांच्याशी संपर्क केला. याकरिता विश्वासने शस्त्रक्रिया करण्याचे सांगून सुमारे बाराशे रुपये खर्च या शस्त्रक्रियेसाठी येणार असल्याचे सांगितले.त्यानुसार शुक्रवारी सकाळी १० वाजता राणे यांच्याकडे विश्वास आला. त्याने हातावर शस्त्रक्रिया करुन टीटीचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला महिलेला दिला.

Web Title: Operator bogus doctor detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.