नव्या बदलाने विदर्भातील 19 बाजार समित्यांची निवडणूक, 10 आर शेती असणा-या शेतक-यांना मताधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 06:47 PM2018-01-10T18:47:34+5:302018-01-10T18:47:49+5:30

आता १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतक-याला सहकारात मताधिकार प्राप्त झाला आहे. निकष बदलाची नियमावली ६ नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली व याच निकषान्वये राज्यातील ३०७ बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे.

With the new change, Vidarbha's 19 market committees are contesting, and farmers who have 10 R. holdings are franchised | नव्या बदलाने विदर्भातील 19 बाजार समित्यांची निवडणूक, 10 आर शेती असणा-या शेतक-यांना मताधिकार

नव्या बदलाने विदर्भातील 19 बाजार समित्यांची निवडणूक, 10 आर शेती असणा-या शेतक-यांना मताधिकार

Next

- गजानन मोहोड
अमरावती : आता १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतक-याला सहकारात मताधिकार प्राप्त झाला आहे. निकष बदलाची नियमावली ६ नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली व याच निकषान्वये राज्यातील ३०७ बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. ३० जून २०१८ पर्यंत मुदत संपणा-या राज्यातील ५३ बाजार समित्या निवडणुकीस पात्र आहेत. यापैकी १९ बाजार समित्या विदर्भातील आहेत. या सर्व ठिकाणी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

नव्या सुधारणेनंतर प्रथमच निवडणुका होणा-या बाजार समित्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील काटोल, हिंगणा, कळमेश्वर, रामटेक, नरखेड, नागपूर व कामठी यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा, दारव्हा, बोरी, पुसद, उमरखेड व दारव्हा, चंदपूर जिल्ह्यात पोंभुर्णा, गडचिरोली, गोंदिया तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा. मलकापूर व सिंदखेडराजा या बाजार समित्यांचा समावेश आहे.

शेतकरी मतदारसंघासाठी प्रत्येक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विद्यमान यादीमध्ये १५ समान गण विभाजन करण्यात येणार आहे. यापैकी पाच गण आरक्षित राहणार आहे. यामध्ये दोन महिलांसाठी एक अनुसूचित जाती व एक अनु. जमातीसाठी व एक नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राहील. आणि एक जागा विमुक्त भटक्या जमातीसाठी राहणार आहे. शेतकरी मतदारसंघातील राखीव जागा लॉटरी पद्धतीने घोषित करण्यात येणार आहे. मतदार यादीतील नावे शेतक-यांच्या वर्णमालेनुसार राहील. यामध्ये पुणे बाजार समितीची निवडणूक विशेष चर्चिली जात आहे.

या बाजार समितीचा कार्यकाळ १३ फेब्रुवारी २०१६ रोजी संपुष्टात आला. परंतु मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे येथील निवडणूक प्रक्रिया रखडली होती. मात्र, ८ आॅगस्ट २०१७ ला निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे मत न्यायालयाने नोंदविल्याने आता राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणद्वारा निवडणूक घेण्यापूर्वी मतदार यादी तयार करण्यात येणार आहे.

यादीची जबाबदारी जिल्हाधिका-यांकडे
- जी व्यक्ती १० आर शेतजमीन धारण करीत आहे व बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील आहे, अशा शेतकरी मतदारसंघाची गावनिहाय प्राथमिक यादी संबंधित बाजार समितीच्या सचिवाला व जिल्हा निवडणूक अधिका-याला बाजार समितीचा कार्यकाळ संपण्याच्या किमान १८० दिवस आधी उपलब्ध करण्याची जबाबदारी जिल्हाधिका-यांची आहे.
- ज्या शेतक-यांनी मागील पाच वर्षांमध्ये शेतमाल किमान तीन वेळा विक्री केला त्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात येतील. संबंधित बाजार समितीच्या क्षेत्रात राहणा-या शेतक-याचे वय निवडणूक जाहीर झाल्याच्या दिवशी २१ वर्षांपेक्षा कमी नसावे आदी उमेदवारीचे निकष आहेत.

Web Title: With the new change, Vidarbha's 19 market committees are contesting, and farmers who have 10 R. holdings are franchised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.