हरिसाल येथे वन्यजीव व्यवस्थापनावर राष्ट्रीय परिसंवाद, देशातील ८० शास्त्रज्ञांचा सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 08:27 PM2017-12-03T20:27:01+5:302017-12-03T20:27:18+5:30

अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचालित जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाच्या वतीने व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन कोलकाताद्वारा पुरस्कृत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद मेळघाटातील मुठवा समुदाय संशोधन केंद्र बोरी हरिसाल येथे आयोजित करण्यात आले आहे.  

National seminar on wildlife management at Harisal, 80 scientists participate in the country | हरिसाल येथे वन्यजीव व्यवस्थापनावर राष्ट्रीय परिसंवाद, देशातील ८० शास्त्रज्ञांचा सहभाग 

हरिसाल येथे वन्यजीव व्यवस्थापनावर राष्ट्रीय परिसंवाद, देशातील ८० शास्त्रज्ञांचा सहभाग 

Next

अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थाव्दारे संचालित जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाच्यावतीने व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन कोलकाताद्वारा पुरस्कृत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद मेळघाटातील मुठवा समुदाय संशोधन केंद्र बोरी हरिसाल येथे आयोजित करण्यात आले आहे.
 
परिसंवादाचे व कार्यशाळेचे उद्घाटन रविवारी इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन माजी अध्यक्ष अशोक कुमार सक्सेना यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय विज्ञान काँग्रेसच्या सचिव विजयालक्ष्मी सक्सेना, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र शेळके, कार्यकारणी सदस्य केशवराव गावंडे, अतुल नेरकर आदींची उपस्थिती होती.  सायन्स अँड इको सिस्टिम्स इन इंडिया असा या राष्ट्रीय परिसंवाद व कार्यशाळेचा विषय आहे. या परिसंवादात देशातील नामांकित ८० शास्त्रज्ञांनी सहभाग  नोंदविला.

निसर्गरम्य मेळघाटातील सातपुडा पर्वतरांगेतील जैवविविधता २१ व्या शतकातील जीवतंत्रज्ञान कौशल्य, वन्यजीव व्यवस्थापन व त्याचे आजच्या  काळातील महत्त्व, वन्यजीव व्यवस्थापनात लोकसहभाग आदी विषयांवर अनेक तज्ज्ञांचे यावेळी मार्गदर्शन लाभले. विविध विषयात तज्ज्ञ प्राध्यापक आपला शोधप्रबंधदेखील यावेळी सादर करण्यात आहेत. या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामध्ये भारतीय वन्यजीव संस्थान ह डेहरादून, सातपुडा फाऊंडेशन राजर्षी शाहू महाविद्यालय चांदूर रेल्वे, महात्मा फुले महाविद्यालय वरूड व मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती यांचाही सहभाग आहे. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य रामेश्वर भिसे यांनी दिला. प्रास्ताविक स्पायडर शास्त्रज्ञ अतुल बोडखे यांनी केले. राजेश उमाळे यांनी कोळी गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. 

 मेळघाटातील विविध वन्यजीवांचा अभ्यास व पेपर प्रेजेंटेशन करण्यासाठी या प्रदर्शनीत ८० शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. सी.सी.एम.डी. हैद्राबाद संस्थेचे डॉ सुनील कुमार यांनी वन्यजीवांच्या डीएनएबद्दल माहिती दिली. वन्यजीवांचे क्राईम  कसे वाढत आहे, यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. हबीबा बिलाल डेहरादून यांनी वाघ जंगलातून कसा वावरतो, त्याला लावलेल्या कॉलर आयडसंदर्भात त्यांनी माहिती दिली. नागपुर येथील लालसिंग मीरी यांनी जंगलात विविध वृक्ष कशी जगवावी, त्यांचे संवर्धन कसे करावे याविषयी पेपर प्रझेंटेशन केले. यावेळी  महाराष्ट्र वाईल्ड लाईफचे वॉर्डन डॉ. ए.के. मिश्रा यांनीही कार्यशाळेला भेट देऊन मार्गदर्शन केले आहे.

Web Title: National seminar on wildlife management at Harisal, 80 scientists participate in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.