नसे भय गृहराज्यमंत्र्यांचेही !

By admin | Published: February 16, 2016 12:07 AM2016-02-16T00:07:27+5:302016-02-16T00:07:27+5:30

शहर पोलिसांची जराही भीती न बाळगता चेनस्नॅचिंगचे राजरोस गुन्हे करणाऱ्या चेनस्नॅचर्सनी गृहराज्यमंत्र्याच्या नगरवास्तव्यादरम्यानही चेनस्नॅचिंग करण्याचे धारिष्ठ््य दाखविले.

Naseyabhara minister's hometown! | नसे भय गृहराज्यमंत्र्यांचेही !

नसे भय गृहराज्यमंत्र्यांचेही !

Next

आव्हान : पोलिसांच्याहीपुढे चेनस्नॅचर्स
अमरावती : शहर पोलिसांची जराही भीती न बाळगता चेनस्नॅचिंगचे राजरोस गुन्हे करणाऱ्या चेनस्नॅचर्सनी गृहराज्यमंत्र्याच्या नगरवास्तव्यादरम्यानही चेनस्नॅचिंग करण्याचे धारिष्ठ््य दाखविले. राजापेठ भागातील हरिगंगा आॅईल मिल परिसरात सोमवारी सायंकाळी चेनस्नॅचिंगचा प्रयत्न झाला. सुदैवाने तो अयशस्वी ठरला. मंगळसूत्र नकली असल्याने महिलेनेही तक्रार नोंदविण्यास नकार दिला. या घटनेला राजापेठचे ठाणेदार एस.एस.भगत यांनी दुजोरा दिला.
अंबानगरीच्या सुरक्षेसाठी दोन हजार पोलिस तैनात आहेत. सीआर मोबाईल, नाकाबंदी, रात्रकालीन गस्त, पायदळ गस्त, वाहतूक पोलिस अशी विविध पातळीवारील सुरक्षा शहरवासीयांसाठी उपलब्ध आहे. तथापि, हे चेनस्नॅचर्स ही तमाम सुरक्षा भेदून पोलिसांना हुलकावणी देण्यात नेहमीच यशस्वी ठरले आहेत. पोलिस आपाल्याला पकडूच शकत नाहीत, असा विश्वास त्यांच्या ठायी आता बळावला आहे.
चेनस्नॅचर्स पोलिसांच्या तुलनेत एक पाऊल पुढे आहेत. चेनस्नॅचर्सच्या गुन्हेगारी पध्दतीच्या कुठल्याशा निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचत असतानाच चेनस्नॅचर्सने चोरीची पध्दती बदविलेली असते. पूर्वी निर्जन भागातून पायदळ जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करण्याचे तंत्र चेनस्नॅचर्सनी अवलंबिले. पुढे त्यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांचा पाठलाग करून दागिणे हिसकावले. कधी कधी पुन्हा ते पायदळ महिलांना लक्ष्य करून दिशाभूल करतात. मंगळसूत्र चोरांवर पोलिसांचा जसा वचक नाही, तसाच तो राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांचाही नाही, हेच सोमवारच्या घटनेतून सिद्ध झाले. रणजित पाटील दिवसभर शहरात असताना, पोलीस मित्रांचा कौतुक सोहळा सुरू असताना चेनस्नॅचरर्सना मंगळसूत्र हिसकावण्यासाठी कुण्या महिलेवर हात घालायला जराही भय वाटू नये, ही बाब पोलीस प्रशासनासाठी निश्चितच चिंतनीय आहे. एक पाय कायम अमरावतीत ठेवणाऱ्या गृहराज्यंमत्र्यांनाही गंभीर दखल घ्यावी, अशीच ही घटना. (प्रतिनिधी)

Web Title: Naseyabhara minister's hometown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.