५५ वर्षांत १२ वेळा मान्सून ‘लेटलतीफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:38 PM2018-07-10T22:38:54+5:302018-07-10T22:39:34+5:30

अलीकडच्या पाच वर्षांत पाऊस लहरी झालेला आहे. किंबहुना गत ५५ वर्षांचा आढावा घेता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळते. या कालावधीत मान्सून तब्बल १२ वेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आलेला आहे.

Monsoon 'late' 12 times in 55 years | ५५ वर्षांत १२ वेळा मान्सून ‘लेटलतीफ’

५५ वर्षांत १२ वेळा मान्सून ‘लेटलतीफ’

Next
ठळक मुद्देनऊ वेळा जून कोरडा : पुनर्वसूच्या बेडकानेच पेरणीला तारले

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अलीकडच्या पाच वर्षांत पाऊस लहरी झालेला आहे. किंबहुना गत ५५ वर्षांचा आढावा घेता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळते. या कालावधीत मान्सून तब्बल १२ वेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आलेला आहे. विशेष म्हणजे या पाच दशकांत नऊ वेळा जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले. या पार्श्वभूमीवर यंदा जुलैच्या दुसºया आठवड्यात होणारे मान्सूनचे आगमन हे उशिराच गणल्या जाते. मात्र, पुनर्वसूच्या बेडकाने शेतकऱ्यांना तारले आहे.
जिल्ह्यासह विदर्भात साधारणपणे जूनच्या ७ ते १० तारखेच्या दरम्यान मान्सूनची सुरूवात होते. ७ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यावर पेरणीची लगबग सुरू होते. २५ जूननंतर पेरण्या आटोपतात. परंतु, मागील पाच वर्षांचा आढावा घेता मान्सूनचे आगमनच उशिरा झाले. ५५ वर्षांत ५ जून १९९० मध्ये सर्वात आधी मान्सूनची नोंद झाली, तर सन २००२ मध्ये २७ जुलैला आलेला मान्सून हा सर्वात उशिरा ठरला आहे. तब्बल १२ वर्षे मान्सूनचे आगमन हे जुलै महिन्यात झालेले आहे. ३८ वर्षे मान्सूनचे ५ ते ३० जून महिन्यात आगमन झाले.
यंदा हवामान विभागाने सरासरीच्या इतपत पावसाचे भाकित केले. प्रत्यक्षात रोहिणी कोरडे गेल्याने शेतकºयांची पेरणीपूर्व मशागतच झालीच नाही. त्यासाठी मृग उजाडले. मृगाच्या मेंढ्याचा पाऊस अधूनमधून पडल्याने मशागतीची लगबग वाढली व २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरूवात झाली. यामध्येदेखील अधूनमधून पाऊस झाल्याने शेतकºयांच्या पेरण्या साधल्या गेल्या. किंबहुना यंदा मान्सूनचे आगमन १४ ते १५ जुलैदरम्यान होत आहे. त्यामुळे निसर्ग भाकितांना दाद देत नाही, हेच वास्तव आहे.
आर्द्रा, पुनर्वसूवरच मदार
यंदाच्या पावसाळ्यात ७ जूनपासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकºयांची मदार २२ जूनपासून लागणाºया आर्द्रा नक्षत्रावर होती व या नक्षत्राचा हत्ती देखील अधूनमधून पाण्यात डुंबला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना मोड आली नाही. मात्र, भुजलातही वाढ झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ६ जुलैपासून सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्रात खºया अर्थाने मान्सूनचे दमदार आगमन होत असल्याने पुनर्वसूचा बेडूक पाण्यात डुंबणार आहे.
२४ तासात सार्वत्रिक पाऊस
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २६.२८ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक ५२ मिमी पाऊस चिखलदरा तालुक्यात पडला. धामणगाव रेल्वे ४१, अमरावती १६.१२, भातकुली २४.७०, नांदगाव खंडेश्वर २५, चांदूर रेल्वे २९.०४, तिवसा २७.४४, मोर्शी २०.८०, अचलपूर ४.९७, चांदूर बाजार २३, दर्यापूर २१.८५, अंजनगाव सुर्जी २७.७०, धारणी ८.४५ व वरूड तालुक्यात ४५.१० मिमी पावसाची नोंद झाली.

Web Title: Monsoon 'late' 12 times in 55 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.