VIDEO : पोलिसाला मारहाण प्रकरणात आमदार बच्चू कडू दोषी, सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 01:15 PM2018-01-17T13:15:13+5:302018-01-17T15:18:19+5:30

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना अचलपूर सत्र न्यायालयाने दणका दिला आहे.

MLA Bachu kadu guilty, sentenced to one year imprisonment | VIDEO : पोलिसाला मारहाण प्रकरणात आमदार बच्चू कडू दोषी, सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा

VIDEO : पोलिसाला मारहाण प्रकरणात आमदार बच्चू कडू दोषी, सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा

Next
ठळक मुद्देबच्चू कडू यांचा वाहतूक पोलीस इंद्रजीत चौधरी यांच्याबरोबर वाद झाला होता. 2004 ते 2014 असे सलग तीनवेळा ते महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले आहेत.

अमरावती - अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना अचलपूर सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. चांदूरबाजारमध्ये वाहतूक पोलीस इंद्रजीत चौधरी यांना मारहाण केल्या प्रकरणात न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने बच्चू कडू यांना सहा महिने तुरुंगवास आणि 1200 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 

बच्चू कडू यांचा वाहतूक पोलीस इंद्रजीत चौधरी यांच्याबरोबर वाद झाला होता. त्यावेळी बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना इंद्रजीत चौधरी यांना मारहाण केली होती. बच्चू कडू हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रमक आंदोलनासाठी ओळखले जातात. यापूर्वी त्यांचे अनेक सरकारी अधिका-यांबरोबर झालेले वाद गाजले आहेत. 

2004 ते 2014 असे सलग तीनवेळा ते महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले आहेत. दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन कडू यांनी शिवसेनेतून राजकीय करीयर सुरु केले होते. पण मतभेद झाल्यानंतर त्यांनी आपली वेगळी चूल मांडली.  आमदार बच्चू कडू यांची प्रहार युवा संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून ते विविध सामाजिक विषयांवर सतत आंदोलने करत असतात. त्यांची आंदोलनाची स्टाईल नेहमीच चर्चेचा विषय बनते.                      

                                                                                   

Web Title: MLA Bachu kadu guilty, sentenced to one year imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.