प्रेमासाठी वाटेल ते; मुलीची आईविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:27 PM2017-12-01T23:27:38+5:302017-12-01T23:28:22+5:30

प्रेमप्रकरणानंतर प्रेमीयुगुल विवाहबद्ध झाले, मात्र, मुलीच्या आईचा विरोध कायम होता. आईच्या विरोधाची धार पाहून मुलीने पोलीस संरक्षणाची मागणी केली तसेच आईविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

To love; Complaint against the girl's mother | प्रेमासाठी वाटेल ते; मुलीची आईविरोधात तक्रार

प्रेमासाठी वाटेल ते; मुलीची आईविरोधात तक्रार

Next
ठळक मुद्देप्रेमीयुगुल विवाहबद्ध : पोलीस आयुक्तासमोर हजेरी

आॅनलाईन लोकमत
अमरावती : प्रेमप्रकरणानंतर प्रेमीयुगुल विवाहबद्ध झाले, मात्र, मुलीच्या आईचा विरोध कायम होता. आईच्या विरोधाची धार पाहून मुलीने पोलीस संरक्षणाची मागणी केली तसेच आईविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. प्रेमासाठी वाटेल ते... करण्याची तयारी मुलीने दाखविल्याने पोलीसांनीही या प्रकरणात सामंजस्याची भूमिका घेतली आहे.
२० वर्षीय मुलगी हरविल्याची तक्रार आईने दोन दिवसांपूर्वी कोतवाली पोलिसांकडे केली होती. दोन दिवस उलटून मुलगी घरी परतली नसल्याने चिंता वाढली होती. पोलीस ठाण्याच्या चकरा वाढल्या होत्या. एका तरुणाने अपहरण केल्याचे तक्रारीत नमूद करून, तुम्ही त्याला पकडून आणले नाही, तर मी आत्महत्या करेन, अशी धमकीच आईने पोलिसांना दिली. आईने थेट पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन मुलीला परत आणण्याची विनवणी केली. आयुक्तांनी कोतवालीच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता बन्सोड यांची कानउघाडणी करून प्रेमीयुगुलाला ताब्यात घेण्यासाठी सक्त निर्देश दिले. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी प्रेमीयुगुलाला नागपूर येथून ताब्यात घेतले आणि अमरावतीत आणले. त्यापूर्वीच दोघे विवाहबद्ध झाले होते. शुक्रवारी प्रेमीयुगुलासह दोघांच्याही आई-वडिलांना पोलीस आयुक्तांसमोर हजर करण्यात आले होते. कुटुंबीयांचा ठाम विरोध होता. मात्र, विवाहबद्ध जोडपे सज्ञान असल्याने विवाह कायदेशीर असल्याची बाब पुढे आली. प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या गोंधळामुळे पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती.
पोलीस आयुक्तालयात प्रकृती बिघडली
मुलीने लग्न केल्याचे कळताच तिच्या आईला धक्का बसला आणि आईची प्रकृती बिघडली. तत्काळ मुलीच्या आईला आॅटोरिक्षात बसवून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते.

दोघेही १८ वर्षांवरील असल्यामुळे त्यांचा विवाह कायदेशीर असल्याचे आढळून आले. यासंदर्भात मुलीने आईविरोधात तक्रार करून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त

Web Title: To love; Complaint against the girl's mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.