जलशुद्धीकरण केद्रातील कोट्यवधींचे साहित्य बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 01:02 AM2018-11-19T01:02:51+5:302018-11-19T01:03:46+5:30

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभागाच्या राजुरा नाका स्थित गोदामातून ८७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. रविवारी फे्रजरपुरा पोलिसांनी चौकशीच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट दिली असता, तेथील सुरक्षाच वाऱ्यावर असल्याचे निदर्शनास आले.

The literature of billions of crores of water purification center | जलशुद्धीकरण केद्रातील कोट्यवधींचे साहित्य बेवारस

जलशुद्धीकरण केद्रातील कोट्यवधींचे साहित्य बेवारस

Next
ठळक मुद्देपोलिसांची घटनास्थळी भेट : मजिप्रा अधिकाऱ्यांवर संशयाची सुई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभागाच्या राजुरा नाका स्थित गोदामातून ८७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. रविवारी फे्रजरपुरा पोलिसांनी चौकशीच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट दिली असता, तेथील सुरक्षाच वाऱ्यावर असल्याचे निदर्शनास आले. जलशुद्धीकरण केंद्राच्या कोट्यवधींच्या मुद्देमालाचा वाली कोण, असा प्रश्न या निमित्ताने उघड झाला आहे.
राजुरा नाका येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या गोदामातून चोरट्यांनी जुने वापरणीचे बेंड, टी रेड्युसर अशाप्रकारचे पाईपलाइनचे साहित्य लंपास केले. १५ नोव्हेंबरदरम्यान हा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार अणुरेखन पदावर कार्यरत रवींद्र शेषराव ढोकणे (५५,रा.दर्यापूर) यांनी १७ नोव्हेंबर रोजी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. रविवारी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी तेथे एकही व्यक्ती उपस्थित नव्हता.
कोट्यवधींचे पाईप व अन्य साहित्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा गार्डदेखील तेथे हजर नव्हते. गोदामाचे शेटर अर्धे उघडलेले होते. त्यामुळे शासनांच्या कोट्यवधींचा माल असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. बेवारस स्थितीत पडलेल्या या साहित्यांचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मजीप्राच्या बिनधास्तपणामुळे शासनाच्या कोट्यवधीच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

Web Title: The literature of billions of crores of water purification center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.