कपाशी, मूग, उडीद पेरणी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:13 PM2019-06-21T22:13:49+5:302019-06-21T22:14:13+5:30

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित आहे. मात्र, पाऊस न आल्याने कपाशी, मूग, उडीद पिकाची पेरणी संकटात आली आहे. जुलैमध्ये पेरणी झाल्यास मूग, उडिदाच्या उत्पादनात घट होते, तर उशिराने पेरणी झाल्यास कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, असे शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे.

Kadashi, Mung, Udiid sowing crisis | कपाशी, मूग, उडीद पेरणी संकटात

कपाशी, मूग, उडीद पेरणी संकटात

Next
ठळक मुद्देपाऊस लांबला : खरिपात फेरबदलाची शक्यता, उत्पादनात घट येण्याची भीती

संजय जेवडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित आहे. मात्र, पाऊस न आल्याने कपाशी, मूग, उडीद पिकाची पेरणी संकटात आली आहे. जुलैमध्ये पेरणी झाल्यास मूग, उडिदाच्या उत्पादनात घट होते, तर उशिराने पेरणी झाल्यास कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, असे शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे. जिल्ह्यात ३३ हजार हेक्टर क्षेत्रावर मूग, ३० हजार हेक्टर क्षेत्रावर उडीद व सर्वाधिक २ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा प्रस्तावित आहे. मान्सून लांबल्याने कपाशी, मूग व उडिदाच्या २.९१ लाख हेक्टर क्षेत्रातील पेरणी संकटात आली आहे. जिल्ह्यात १ ते २१ जूनदरम्यान १०२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याचवेळी ६१ मिमी पाऊस कोसळला होता.
मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यास कापूस, मूग, उडीद पीक पेरणीवर परिणाम होऊन क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी २ जुलैपर्यंत पावसाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरही पाऊस न आल्यास पिकात फेरबदल करावे लागणार असून, कपाशीचे सरळ, सुधारित वाण पेरणीसाठी योग्य राहील, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. सोयाबीनला भाव नसल्याने यंदा कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता होती. मात्र, २१ जूनअखेर पाऊस न आल्याने कापसाचा पेरा लांबला आहे.
खरीप हंगामात कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांची पेरणी साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. तथापि, जिल्ह्यात यंदा जून महिन्याचा तिसरा आठवडा संपला तरी पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी ७ जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले. २२ जूनपर्यंत हे नक्षत्र राहील. ३० जूनपर्यंत दीड नक्षत्र संपलेले असेल. तोपर्यंत जर मान्सून आला नाही, तर शेतकºयांना पिकात बदल करावे लागणार आहेत. मागील काही वर्षांत मूग, उडीद पिकाचे क्षेत्र घटले आहे. यावर्षी मान्सून वेळेवर येईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. परंतु, अद्याप मान्सून पोहोचला नाही. त्याचा परिणाम जलसाठ्यावरही होणार आहे.

पाऊस लांबल्याने कपाशी, मूग व उडिदाचा पेरा कमी होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कपाशीच्या पेरणीस उशीर झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. खरिपासोबतच संत्र्यांचा अंबिया बहर धोक्यात आहे.
- वसंतराव कडू,
शेतकरी, येणस

साधारणत: जूनच्या दुसºया आठवड्यात पेरणी झाल्यास उत्पादन बरे होते. मात्र, तिसरा आठवडा संपत असताना पावसाचा मागमूस नाही. कपाशी, मूग व उडिदाची पेरणी यामुळे संकटात आली आहे.
- पद्माकर भेंडे,
शेतकरी, पहूर

धोंडी धोंडी पाणी दे : पावसाळ्याचा महिना असूनही हवा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकºयांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. सोयाबीन, मूग, तूर, पऱ्हाटी या पिकांसह सर्वच खरीप पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. त्याअनुषंगाने वरुणराजाला साकडे घालण्यासाठी बुधवारी शेंदूरजनाघाट येथे धोंडी काढण्यात आली. ‘धोंडी धोंडी पाणी दे, साळ-माळ पिकू दे’ असे आवाहन करत युवा वर्गाने ज्येष्ठांच्या सोबतीने या परंपरेला उजाळा दिला

Web Title: Kadashi, Mung, Udiid sowing crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस