डाव्यांचे जिल्हा कचेरीसमोर जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:13 AM2018-08-10T01:13:18+5:302018-08-10T01:14:13+5:30

सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी महागाई, रोजगार, किसान वेतन, संपूर्ण कर्जमाफी यासह अन्य मागण्यांसाठी नेहरू मैदान येथून जिल्हाकचेरीवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी डाव्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र घोषणा बाजी करीत जेलभरो आंदोलनाव्दारे मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.

Jhel Bharo Movement in front of the Left District Council | डाव्यांचे जिल्हा कचेरीसमोर जेलभरो आंदोलन

डाव्यांचे जिल्हा कचेरीसमोर जेलभरो आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी महागाई, रोजगार, किसान वेतन, संपूर्ण कर्जमाफी यासह अन्य मागण्यांसाठी नेहरू मैदान येथून जिल्हाकचेरीवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी डाव्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र घोषणा बाजी करीत जेलभरो आंदोलनाव्दारे मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.
आंदोलकांच्या मागण्यांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, किमान वेतन १८ हजार रूपये मिळाले पाहिजे, सर्व योजना कर्मचाऱ्यांना (अंगणवाडी, शालेय पोषण, आशा), शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेपर्यंत कर्मचाऱ्यांना १० हजार रूपये मानधन द्यावे, कामगार कायद्यातील कामगार विरोधी बदल मागे घ्या, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा, सर्व औषधीवरील जी.एस.टी. रद्द करा, सेल्स प्रमोशन अ‍ॅक्टची अंमलबजावणी करा, सर्व असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा, खासगीकरणाचे धोरण रद्द करावे आदी मागण्यांसाठी डाव्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर जेलभरो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स् (सीटू) जिल्हा कमेटी अध्यक्ष कॉ. उदयन शर्मा, कॉ. सुभाष पांडे, जिल्हा सचिव, रमेश सोनुले, महेंद्र बुब, अभय देव, राहुल उरकुडे, मनीष नानोटी, अशोक दंडाळे, राजेंद्र गायगोले, राजेंद्र भांबोरे, अंकुश वाघ, सफिया खान, प्रतिभा शिंदे, पद्माताई गजभिये. अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मंगला ठाकरे, चंदा वानखडे, आशा वैद्य, चित्रा बोरकर, वनिता किल्लेकर, शालिनी रत्नपारखी, वहिदा कलाम, शोभा गवळी, अरूण नितनवरे, सुनीता कवाडे, आशा हमजादे, शालेय पोषण कामगार संघटनेच्या संगीता लांडगे, जिल्हा सचिव रजनी पिंपळकर, संगीता दाभणे, कांताबाई राईकवार, चंदा पंडागडे मोर्शी, वर्षा सहारे, अर्चना बायस्कर तिवसा, संगीता चौधरी, लता वंजारी धामणगाव रेल्वे, सारिका घोरपडे, संजय राजूरकर वरूड, राजकन्या सावरकर, उज्ज्वला हगवणे, आशा वर्कर संघटना (सीटू)च्या वंदना बुरांडे जिल्हा सचिव, नलिनी बोरकर, अनिता जगताप, ममता काळे, शारदा शेजव, उषा कुºहाडे, रत्नपारखी, करूले आदींचा सहभाग होता.

Web Title: Jhel Bharo Movement in front of the Left District Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा