धनगर आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:22 PM2018-08-13T22:22:54+5:302018-08-13T22:23:19+5:30

धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी शक्ती एकवटली आहे. धनगर समाजास अनुसूचित जमाती (एस.टी) आरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या पुण्यातिथीनिमित्त १३ आॅगस्ट रोजी जिल्हाकचेरीसमोर धरणे देण्यात आले.

The issue of Dhanagara reservation is also on the anvil | धनगर आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर

धनगर आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलन : जिल्हा कचेरीसमोर धनगर समाज महासंघाचे धरणे

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी शक्ती एकवटली आहे. धनगर समाजास अनुसूचित जमाती (एस.टी) आरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या पुण्यातिथीनिमित्त १३ आॅगस्ट रोजी जिल्हाकचेरीसमोर धरणे देण्यात आले.
धनगर समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सवलती द्याव्यात याकरिता समस्त धनगर समाजाचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने शासनाकडे मागणी लावून धरण्यात आली आहे. मात्र, शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. वास्तविक देशाच्या सर्वोच्च घटनेने धनगर समाजाचा उल्लेख घटनेच्या परिशिष्ट दोनमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ नुसार केल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे धनगर समाजास आरक्षणाच्या सोयी सवलती मिळणे आवश्यक आहे. परंतु राज्य शासनाने यासंदर्भात कुठलीच कार्यवाही केलेली नाही. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळत नसल्याने धनगर समाज मूलभूत हक्कापासून वंचित राहिला. न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. भाजप सरकारने सत्तेवर येताच धनगर समाजास आरक्षणाच्या सवलती लागू करू व मेंढपाळांचे प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर येऊन जवळपास चार वर्षे लोटली, तरीही आरक्षणासंदर्भात कार्यवाही केली नाही. त्यामुळे धनगर समाजात तीव्र नाराजी आहे. सोमवारी धनगर समाज महासंघाने धरणे आंदोलनाव्दारे शासनाचे मागणीकडे लक्ष वेधले. यावेळी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले, असे परमेश्र्वर घोंगडे व सतीश होळकर आणि योगेश कारके आदी हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यात आली. आंदोलनात वसंत लवणकर, दिलीप एडतकर, उमेश घुरडे, सुरेश उंद्रे, राजेंद्र म्हस्के, ज्ञानेश्र्वर ढोमणे, सचिन कोल्हे, कै लास निंघोट, लक्ष्मण उघडे, मनीष तुपटकर, स्वप्निल साव, सुनील लव्हाळे, रंगराव शिंदे, लिबाजी माने, छबू मातकर, सुनंदा पाठक, नंदा लवणकर, मिना घुरडे,अस्मिता ढोमणे, छाया औघड, अर्चना टेकाडे, संगिता गोरडे, वर्षा नवरंगे, कोकीळा घुरडे, वर्षा मोहोड, वासुदेव पाठक, रंगराव बिचूकले, शालीक थोरात, महेश तायडे, गजानन गावडे, जनार्धन नवरंगे, किशोर नवले, बाबूलाल नवले, बनकर, राजेश शेंद्रे आदी सहभागी झाले होते.

रास्ता रोको करून अहल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी
अमरावती : राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आस्वासनाची पुर्तता तत्काळ करण्यासाठी धनगर समाज संघर्ष समितीद्वारा सोमवारी येथील रहाटगाव चौकात राष्ट्रीय महामार्गावर महामार्गवर रस्ता रोको करण्यात आला व याच ठिकाणी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री महादेव जानकर व खा. विकास महात्मे यांच्या समवेत १० आॅगष्टला सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा करण्यात आली. यावेळी धनगर समाजाला अनूसुचित जमातीचे आरक्षण देण्याविषयी संवाद झाला. मेंढ्यांना उपलब्ध वनजमिनीवर चराईक्षेत्र करण्याबाबत तत्काळ अध्यादेश काढण्यासाठी सबंधित सचिवांना आदेशीत केले. सोलापूर विद्यापीठाला ‘पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर विद्यापीठ’ असे नामांतर करण्याविषयी ठोस आस्वासन दिले. शेळ्या मेंढ्यांची निर्यात सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याविषयीचे आस्वासन दिले व राष्ट्रीय शेफर्ड कमिशन नेमन्याविषयी सचिवांना सांगीतले. शासनाने आस्वासन दिले असले तरी या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी व्हावी, यासाठी सोमवारी रस्ता रोको करण्यात आला. यावेळी संतोष महात्मे, मेघश्याम करडे, जानराव कोकरे, शंकरराव भदे, प्रकाशराव बोबडे, तुकाराम यमकर, हरिभाऊ शिंदे, शरद शिंदे, पंकज गोहत्रे, विलास अघडते, अरविंद पावडे, मनोज माहुलकर, दिकल गावनेर, दिपक गोहत्रे, दिनेश ढोक, साहेबराव भागवत, आदी उपस्थित होते.
तासभर रस्ता रोको, वाहतूक ठप्प
धनगर समाज संघर्ष समितीद्वारा महामार्गवर तासभर रस्ता रोको करण्यात आला. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा शेकडो वाहनांची रांग लागली होती. यादरम्यान एक रुग्णवाहिका आली असता, आंदोलनकर्त्यांनी क्षणभरात रस्ता मोकळा केला. या आंदोलनात कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेच्या मार्गाने आंदोलन पार पडले.

Web Title: The issue of Dhanagara reservation is also on the anvil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.