राष्ट्रसंतांच्या महासमाधीला शेकडो भागिनींची ओवाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 09:51 PM2018-11-09T21:51:11+5:302018-11-09T21:51:35+5:30

भाऊबीजेच्या मुहूर्तावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीवर ओवाळणीचा लक्षवेधी कार्यक्रम सामुदायिक प्रार्थना आटोपल्यावर पार पडला.

Hundreds of Hundreds of Nation's Secretaries | राष्ट्रसंतांच्या महासमाधीला शेकडो भागिनींची ओवाळणी

राष्ट्रसंतांच्या महासमाधीला शेकडो भागिनींची ओवाळणी

Next
ठळक मुद्देभाऊबीजेचा मुहूर्त : राष्ट्रसंतांना केले नमन, जीवन मंगलमय होण्याची कामना

लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज (मोझरी) : भाऊबीजेच्या मुहूर्तावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीवर ओवाळणीचा लक्षवेधी कार्यक्रम सामुदायिक प्रार्थना आटोपल्यावर पार पडला.
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, जया सोनारे, नीलेश इंगळे, उद्धव वानखडे, रघुनाथ कर्डीकर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सुषमा लकडे यांनी महासमाधीजवळ दिवाळीच्या मुहूर्तावर राष्ट्रसंताच्या भाऊबीजेची संकल्पना समजावून सांगितली. प्रार्थनेमुळे विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होते. भाऊबीज हा दिवाळी सणातील राजा आहे. यातील पाच दिवसांचे स्वतंत्र महत्त्व आहे. बहीण-भावाच्या नात्याला स्नेहातून गोडवा निर्माण करणारा हा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी परिसरातील शेकडो भागिनींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीला ओवाळणी घातली आणि आपले जीवन मंगलमय व्हावे, अशी कामना केली.

Web Title: Hundreds of Hundreds of Nation's Secretaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.