‘तिच्या’ शरीरावर सात वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 01:17 AM2019-07-10T01:17:53+5:302019-07-10T01:19:13+5:30

माथेफिरूने अर्पिता ठाकरेवर चाकूचे तब्बल सात वार केल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले. घटनास्थळी हत्येच्या थराराने नागरिक भयभीत झाले होते, तर इर्विन रुग्णालयात अर्पिताचा मृतदेह पाहून संतप्त नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने खळबळ उडाली होती.

'Her body' has seven wars | ‘तिच्या’ शरीरावर सात वार

‘तिच्या’ शरीरावर सात वार

Next

अमरावती : माथेफिरूने अर्पिता ठाकरेवर चाकूचे तब्बल सात वार केल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले. घटनास्थळी हत्येच्या थराराने नागरिक भयभीत झाले होते, तर इर्विन रुग्णालयात अर्पिताचा मृतदेह पाहून संतप्त नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने खळबळ उडाली होती.
तुषार मस्करेने अर्पिताची निर्घृण हत्या केल्यानंतर राजापेठ पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. प्रेमप्रकरण सुरू ठेवण्यास अर्पिताने नकार दिल्याने तिची हत्या केल्याची कबुली त्याने राजापेठ पोलिसांना दिली. अर्पिता व तुषार यांचे प्रेमप्रकरण शाळेपासून होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या भेटीगाठी झाल्या. २०१५ मध्ये सालबर्डी येथील मंदिरात त्यांनी लग्न केले. त्यांच्या प्रेमप्रकरणाची भनक कुटुंबीयांना लागली. त्यांनी विरोध दर्शविल्यामुळे अर्पितानेही तुषारला नकार दिला होता. तरीसुद्धा तुषार मागावर असल्याचे पाहून अर्पिताचे कुटुंबीय बडनेरा पोलीस ठाण्यात गेले होते. पोलिसांकडे तोंडी तक्रार करून तुषारला समजाविण्याची विनंती केली. पोलिसांनी ठाण्यात दोघांच्या नातेवाइकांना बोलावून तुषारला समज दिला. यापुढे अर्पिताच्या मागे लागणार नसल्याचे त्यावेळी तुषारने लेखी दिले. तरीसुध्दा तुषारने अर्पिताचा पिच्छा पुरविला. मात्र, तिचा नकार कायम असल्याने मंगळवारी त्याने अर्पिताची हत्या केली. घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्यासह उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त बळिराम डाखोरे यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठले होते.
आक्रोश अन् गोंधळ
अर्पिताचे वृत्त कळताच कुटुंबीय व परिचयातील अनेक व्यक्ती इर्विन रुग्णालयात दाखल झाले. तिचा मृतदेह पाहून नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. नातेवाइकांचा प्रचंड आक्रोश व संताप पाहून गोंधळ उडाला होता. त्यामुळे पोलिसांचा ताफा इर्विन रुग्णालयात पोहोचला.

प्रेमसंबधांला नकार दिल्याने आरोपीने चिडून तरुणीची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरु आहे.
- संजयकुमार बाविस्कर
पोलीस आयुक्त

मुस्लीम टोपी परिधान केली होती तुषारने
आरोपी तुषार हा नागरिकांची व पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने मुस्लीम गोल टोपी परिधान करून आला होता. हत्येनंतर तो पसार झाला असता, तर मुस्लीम तरुणाने हत्या केल्याचा संशय निर्माण झाला असता, हा त्यामागे उद्देश होता.

प्रत्यक्षदर्शीने पकडले तुषारला
तुषारने वर्दळीच्या रस्त्यावर अर्पितावर चाकूचे वार केले. यावेळी सचिन वानखडे, नावेद, राजू लंगोटे व रवींद्र पाचंगे यांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्यांना पाहून तुषारने पलायन केले. सचिन व नावेद यांनी त्याला पकडले, तर रवींद्र व राजू यांनी अर्पिताला रुग्णालयात पाठविले.

न्यायवैद्यक तज्ज्ञांनी घेतले रक्तांचे नमुने
राजापेठ पोलिसांनी घटनास्थळावर पडलेल्या रक्तांचे नमुने गोळा केले. जमिनीवर पडलेले रक्त एका विशिष्ट कागदाद्वारे बॉटलमध्ये घेण्यात आले आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीकरिता हे रक्तनमुने पाठविले जाणार आहेत.

मैत्रिणीची तुषारशी झुंज
तुषारने अर्पितावर चाकूने वार करताच तिच्या मैत्रिणीने धाडसी वृत्तीचा परिचय देत तुषारच्या हातातील चाकू हिसकण्याचा प्रयत्न केला. तुषारसोबत तिची झटापट झाली. चाकूने अर्पिताच्या मैत्रिणीच्या हातावर जखमा झाल्या.

Web Title: 'Her body' has seven wars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.