गतवैभव प्राप्त व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 09:42 PM2017-09-15T21:42:46+5:302017-09-15T21:43:12+5:30

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या गुरूवारी झालेल्या निवडणुकीत अ‍ॅड.अरूण शेळके गटाचे एक सदस्य वगळता सर्वांचा पराभव झाला .....

To gain the good fortune | गतवैभव प्राप्त व्हावे

गतवैभव प्राप्त व्हावे

Next
ठळक मुद्दे‘शिवपरिवारा’ची आशा : हर्षवर्धन देशमुख समर्थकांचा जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या गुरूवारी झालेल्या निवडणुकीत अ‍ॅड.अरूण शेळके गटाचे एक सदस्य वगळता सर्वांचा पराभव झाला व माजीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या परिवर्तन पॅनेलचे आठ सदस्य निवडून आलेत. प्रस्थापितांना छेद देणारी ही निवडणूक ठरली. निवडणुकीचा शिमगा सरल्यानंतर आता कवित्व उरले आहे. शिवपरिवारात आपापल्यापरिने या निवडणुकीचे अन्वयार्थ काढले जात आहेत.
गुरूवारी रात्री आठनंतर मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात झाली. सुरूवातीला मतपत्रिकांचे गठ्ठे बांधण्यात आले व रात्री १० नंतर खºया अर्थाने ५ टेबलवर मतमोजणी सुरू झाली. सुरूवातीला चार सदस्यपदांसाठी झालेल्या मतमोजणीत परिवर्तन पॅनेलचे तीन सदस्य निवडून आले. चवथा शेळके पॅनलचा व पाचवा पुन्हा परिवर्तनचा असल्यामुळे सभासदांचा नेमका सूर दिसून आला.
यामध्ये परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. त्यामुळे ‘प्रस्थापितांना नाकारून नव्यांना संधी’हा मतदारांचा कौल स्पष्ट झाला. मागील दहा वर्षांपासून संस्थेवर असलेला अरूण शेळके यांचा एकछत्री अंमल या निवडणुकीमुळे मोडीत निघाला आहे. राज्यातील शिक्षणक्षेत्रात कधीकाळी अग्रणी राहिलेल्या या संस्थेला पुन्हा सोन्याचे दिवस यावेत, यासाठीट हे तख्तपालट झाल्याची चर्चा होती. आता संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासमोर संस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान असेल.
हेमंत काळमेघ यांना सर्वाधिक मते
परिवर्तन पॅनेलचे सदस्यपदाचे उमेदवार हेमंत काळमेघ यांना सर्वाधिक ४८७ मते मिळाली. निवडणूक रिंगणातील ४४ उमेदवारांच्या तुलनेत ही मते सर्वाधिक आहेत. त्यांचे वडील व संस्थेचे माजी अध्यक्ष दादासाहेब काळमेघ यांचा मोठा चाहता वर्ग शिवपरिवारात आहे. तसेच हेमंत यांचा व्यक्तीगत संपर्क देखील मोठा असल्याने त्यांना ही भरभरून मते मिळाली आहेत.

Web Title: To gain the good fortune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.