यूट्यूबच्या सहाय्याने बनविले बनावट एटीएम कार्ड, आरोपी बिस्वासची कबुली; राज्यभरातील बँक खातेदारांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 06:24 PM2017-12-30T18:24:16+5:302017-12-30T18:24:29+5:30

मुख्य आरोपी हरिदास हरविलास बिस्वास (२९, रा.जि. मलकानगिरी, ओडिशा) याने यू-ट्यूबच्या व्हिडीओवरून बनावट एटीएम कार्ड बनवून ग्राहकांच्या बँक खात्यातून रकमेची परस्पर उचलेगिरी केल्याची कबुली अमरावती पोलिसांनी दिली आहे.

Fake ATM card created by using YouTube, accused Biswas confession; Bank accounts of bank account holders across the state | यूट्यूबच्या सहाय्याने बनविले बनावट एटीएम कार्ड, आरोपी बिस्वासची कबुली; राज्यभरातील बँक खातेदारांची फसवणूक 

यूट्यूबच्या सहाय्याने बनविले बनावट एटीएम कार्ड, आरोपी बिस्वासची कबुली; राज्यभरातील बँक खातेदारांची फसवणूक 

Next

वैभव बाबरेकर
अमरावती : मुख्य आरोपी हरिदास हरविलास बिस्वास (२९, रा.जि. मलकानगिरी, ओडिशा) याने यू-ट्यूबच्या व्हिडीओवरून बनावट एटीएम कार्ड बनवून ग्राहकांच्या बँक खात्यातून रकमेची परस्पर उचलेगिरी केल्याची कबुली अमरावती पोलिसांनी दिली आहे. अमरावती पोलिसांनी त्याच्यासह विशाल तुळशीराम उमरे (३४, रा. वरोरा, चंद्रपूर) व किसन लालचंद यादव (३०, रा. गाजीपूर, दिल्ली) या तिघांना प्रॉडक्शन वाँरटवर ताब्यात घेऊन चंद्रपूरहून शनिवारी अमरावतीत आणले. 
बँक खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे चोरणाºया टोळीतील परितोष पोतदार नामक आरोपीला अमरावती पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. चंद्रपूर पोलिसांनीही या टोळीतील तिघांना अटक केली. अमरावती जिल्ह्यात घडलेल्या २३ गुन्ह्यांत या आरोपींची चौकशी सुरू आहे. तिन्ही आरोपींची पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमक्ष पेशी झाली. त्यावेळी हरिदास बिस्वासने फसवणुकीचा फंडा उघड केला. दिल्लीत एमबीएचे शिक्षण घेत असताना त्याने इंटरनेटच्या माध्यमातून यू-ट्यूबवर एटीएम क्लोनिंगचे व्हिडीओ पाहिले. त्यानेही बनावट एटीएम कार्ड बनविण्याचा बेत आखला. यासाठी अन्य सहकारी आरोपींना विविध राज्यांमध्ये एटीएमधारकांचा डेटा चोरण्यास पाठविले. विशाल उमरे हा विदर्भातील विविध एटीएममध्ये जाऊन ग्राहकांच्या मागे उभा राहून त्यांच्या एटीएमचे १६ अंक व पीन हेरायचा व लगेच मोबाइलवर टाइप करून दिल्लीत बसलेल्या बिस्वासला पाठवायचा. बिस्वास ब्लँक एटीएम कार्ड मार्केटमधून विकत घेऊन लॅपटॉप व 'एनकाऊन्टर कार्ड रायटर' या मशीनद्वारा खातेदारांचे बनावट एटीएम कार्ड तयार करायचा. हे कार्ड किसनलाल यादवकडे पाठवून नोएडा, गुडगाव येथील एटीएममधून पैसे काढण्यासाठी पाठवायचा. या कामासाठी किसनलाल यादवला २० टक्के कमिशन मिळत होते. अशाप्रकारे देशभरातील अनेक बँक खात्यातून लाखो रुपयांची रोख चोरल्याची माहिती बिस्वासने अमरावती पोलिसांना दिली. 

एटीएम, शॉपिंग मॉलमध्येही काढला माग
बिस्वासचे सहकारी एटीएम, शॉपिंग मॉल व अन्य आॅनलाइन खरेदीच्या ठिकाणी जाऊन बँक खातेदारांचा डेटा हेरायचे. विशाल उमरे याच कामासाठी अमरावतीत निर्मला लॉजवर राहिल्याची कबुली त्याने पोलिसांनी दिली. बँक खातेदारांच्या मागे उभे राहून शोल्डर रिडिंगचा फंडा वापरून तो नागरिकांच्या हातातील एटीएमवर लक्ष वेधायचा. त्यावरील १६ पैकी ८ अंक जवळपास सारखेच असायचे. त्यामुळे केवळ शेवटचे चार अंक मोबाइलवर टाइप करून ते लगेच बिस्वासला पाठवायचे.  पैसे विड्रॉल करणाºया खातेदार कोणता पिन टाइप करतो, याकडे तो लक्ष ठेवायचा. ते चार अंक स्मरणात ठेवून काही वेळानंतर तो बिस्वासला पाठवायचे काम विशाल करीत होता. यासाठी बिस्वास विशालला ५०० रुपये द्यायचा. खात्यातून जास्त रक्कम निघाली, तर १० टक्के कमिशनसुद्धा देत होता.

नोटाबंदीच्या काळ्यात मंदावला धंदा
हरिदास बिस्वास हा २००९ मध्ये शिक्षणासाठी दिल्लीत गेला. भाड्याने खोली करून तो बहिणीसोबत राहत होता. कालातंराने त्याने सायबर गुन्हेगारीत प्रवेश केला. नोटाबंदीच्या काळात एटीएममधून केवळ दोन हजार रुपयेच निघत असल्याने त्याचा धंदा मदावला होता. 

अमरावतीतून चोरला सर्वाधिक डेटा 
विशाल उमरे याने शहरातील एक लॉजवर राहून दररोज एटीएमची झडती घेतली. एसबीआयची बडनेरा शाखा, श्याम चौक स्थित मुख्य शाखा, राठीनगर व गाडगेनगरातील शाखेत दररोज रांगेमध्ये उभे राहून बँक खातेदारांची माहिती बिस्वासला मोबाइलवर पाठविण्याचे काम केले. राज्यभरातील गुन्ह्यांचा आलेख लक्षात घेता, अमरावतीमधून विशालने सर्वाधिक डेटा चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.  

बँक खाती गोठवली
शेकडो जणांच्या बँक खात्यावर डल्ला मारणाºया बिस्वासकडून चंद्रपूर पोलिसांनी ५६ हजारांची रोख जप्त केली आहे. बिस्वास ३० टक्के रक्कम ठेवून कमिशन व वाहतुकीवर इतर खर्च करीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या गोरखधंद्यातून सहा लाखांची कमाई केल्याचे तो सांगत असला तरी ही रक्कम बरीच मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Web Title: Fake ATM card created by using YouTube, accused Biswas confession; Bank accounts of bank account holders across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.