बडनेºयात भरवस्तीत कोल्ह्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:55 PM2017-10-29T22:55:51+5:302017-10-29T22:56:14+5:30

दुर्मिळ तसेच शेड्युल दोन या प्रकारात मोडणारा कोल्हा या प्राण्याचा बडनेºयात भरवस्तीत मृत्यू झाल्याची बाब रविवार २९ रोजी उघडकीस आली.

Due to the death of the fishery in large numbers | बडनेºयात भरवस्तीत कोल्ह्याचा मृत्यू

बडनेºयात भरवस्तीत कोल्ह्याचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देवनपाल घटनास्थळी नाही : शेड्युल दोनचा प्राणी

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : दुर्मिळ तसेच शेड्युल दोन या प्रकारात मोडणारा कोल्हा या प्राण्याचा बडनेºयात भरवस्तीत मृत्यू झाल्याची बाब रविवार २९ रोजी उघडकीस आली. भरवस्तीत झालेल्या मृत्यूने वनविभागाकडे अनेक प्रश्न उभे ठाकले, असे असताना प्रत्यक्षात या सर्कलचे वनपाल घटनास्थळी पोहोचेल नव्हते. कोल्हाच्या मृत्यूची चर्चा शहरात होती.
जुन्या वस्तीच्या कंपासपुरा येथील गजानन मोहोड यांच्या घराशेजारी कोल्हा मृतावस्थेत रविवारी सकाळी नागरिकांना दिसला.
वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. बडनेरा वनविभाग परिक्षेत्राचे दोन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाहणी करून मृत कोल्ह्याला घेऊन गेले. वाघ, बिबट यांच्यानंतर कोल्ह्याची गणना वनविभागात होते. त्याच्या सुरक्षेवर अधिक भर दिला जातो. मेळघाट परिसरात कोल्हे आहेत, मात्र अमरावती परिसरालगतच्या जंगलात कोल्हा दूर्मिळ असल्याच्ी माहिती आहे. कोल्हा भरवस्तीत आलाच कसा, त्याचा मृत्यू कशामुळे झाला असावा, यासह इतरही कारण वनविभागाला तपासावा लागणार आहे. बडनेरा सर्कलचे वनपाल घटनास्थळावर पोहोचलेच नव्हते. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. मृत कोल्ह्याचे विच्छेदन केले जाणार होते. त्या मृत कोल्ह्याला पाहण्यासाठी एकच गर्दी जमली होती. बडनेºयात व परिसरात दुर्मिळ बिबट, हरियाल पक्षी आता कोल्हा या प्राण्यांचा मृत्यू झाला. कोंडेश्वर परिसराला लागूनच घनदाट जंगल आहे. या मृत्यूने प्राणी किती सुरक्षित आहे व संबंधित वनविभाग त्यांच्याप्रती किती जागरुक आहे, हे दिसून येते.

Web Title: Due to the death of the fishery in large numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.