डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातर्फे कायदेविषयक जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:17 AM2018-02-20T00:17:18+5:302018-02-20T00:17:52+5:30

येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमांतर्गत पथनाट्य, ग्रामसभा, चर्चासत्राद्वारे नागरिकांचे कायद्याबाबत वस्तुनिष्ठ मार्गदर्शन केले.

Dr. Legal Awareness by Panjabrao Deshmukh Vidhi College | डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातर्फे कायदेविषयक जनजागृती

डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातर्फे कायदेविषयक जनजागृती

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग : गावोगावी पथनाट्य, ग्रामसभा, चर्चासत्राद्वारे नागरिकांचे प्रबोधन

आॅनलाईन लोकमत
अमरावती : येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमांतर्गत पथनाट्य, ग्रामसभा, चर्चासत्राद्वारे नागरिकांचे कायद्याबाबत वस्तुनिष्ठ मार्गदर्शन केले. खारतळेगाव, धामोरी, मदलापूर, खोलापूर, शिंगणापूर या गावांमध्ये हे ेअभियान राबविण्यात आले.
विधी महाविद्यालयातील तीन वर्षीय अभ्यासक्रमातील चौथ्या सेमिस्टरचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच पाच वर्षीय अभ्यासक्रमातील आठव्या सेमिस्टरचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यातर्फे प्राचार्य प्रणय मालवीय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कायदेविषयक अभियानप्रमुख प्रकाश दाभाडे यांच्या नेतृत्वात हे अभियान यशस्वीपणे राबविले गेले. दरम्यान, खोलापूर पोलीस ठाण्यात अभ्यासक्रमांतर्गत भेट देण्यात आली.
विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पूर्वपरवानगी दिल्यामुळे सर्वांनी खोलापूर येथील पोलीस ठाण्याला भेट दिली. ठाणेदार चवरे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील कार्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन समाधान केले. त्याचप्रमाणे दुय्यम ठाणेदार जांभळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियानप्रमुख प्रकाश दाभाडे यांनी केले. आभार प्रदर्शन सुरक्षा तातेड यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कायद्याच्या प्रचारार्थ पथनाट्य या गावांमध्ये सादर केले.
खारतळेगाव येथे समीर पठाण यांच्या नेतृत्वातील विद्यार्थ्यांच्या गटाने ‘स्त्री भ्रूणहत्या’, तर शिंगणापूर येथे कायद्याचा प्रचार करण्याच्या उद्देशाने पथनाटिकेचे सादरीकरण केले. प्रात्यक्षिक प्रमुख प्रकाश दाभाडे यांनी पथनाटिका अंतर्गत तंटामुक्त गाव निर्माण व्हावे, या उद्देशाने मार्गदर्शन केले. पंकज थोरात यांच्या नेतृत्वातील विद्यार्थ्यांच्या गटाने ‘शेतकऱ्यांची आत्महत्या व त्यावरील उपाययोजना’ तर अंकुश नाचणे यांच्या नेतृत्वातील विद्यार्थ्यांच्या गटाने ‘महिला सशक्तीकरण, चैतन्य गावंडे यांच्या नेतृत्वातील विद्यार्थ्यांच्या गटाने ‘स्त्री-पुरुष समानता’, तर सायमा राराणी यांच्या नेतृत्वातील विद्यार्थ्यांच्या गटाने ‘मोटार अपघात’, रिबिका इंगळे यांच्या नेतृत्वातील विद्यार्थिनीच्या ग्रुपने ‘हुंडाबळी’ या विषयावर पथनाटिका सादर करून ग्राम शिंगणापूर येथे कायद्याचा प्रचार-प्रसार केला.
कायदेविषयक जनजागृतीचा समारोपीय कार्यक्रम शिंगणापूर येथे विश्वस्त प्रदीप देशमुख यांच्या सहकार्याने घेण्यात आला. सरपंच शशिकला इंगळे, उपसरपंच सचिन यावले, राहुल बावणे, ज्ञानेश्वर खलोकार, उपसरपंच गजानन उंबरकर, देवानंद इंगळे, गौतम इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन गौरी पुरोहित व आभार प्रदर्शन काजल सोळंके हिने केले. समारोपीय कार्यक्रमा सोळंके यांच्या ग्रुपने ‘कौटुंबिक हिंसाचार’ या ज्वलंत विषयावर उत्कृष्ट पथनाटिका सादर केली.

Web Title: Dr. Legal Awareness by Panjabrao Deshmukh Vidhi College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.