अज्ञात वाहनाच्या धडकेत भावंडांचा मृत्यू, रात्रभर मृतदेह रस्त्याच्या कडेला होते पडून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 08:03 PM2018-01-02T20:03:24+5:302018-01-02T20:03:29+5:30

नांदगावपेठ परिसरातील बिझीलँड येथे एका व्यापारी प्रतिष्ठानात काम करणा-या दोघा भावांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.

The death of the brothers was in the driving of an unknown vehicle, and the bodies were lying on the road all night | अज्ञात वाहनाच्या धडकेत भावंडांचा मृत्यू, रात्रभर मृतदेह रस्त्याच्या कडेला होते पडून

अज्ञात वाहनाच्या धडकेत भावंडांचा मृत्यू, रात्रभर मृतदेह रस्त्याच्या कडेला होते पडून

Next

अमरावती : नांदगावपेठ परिसरातील बिझीलँड येथे एका व्यापारी प्रतिष्ठानात काम करणा-या दोघा भावांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. सोमवारी रात्री वलगाव ते वाळकी मार्गावर अपघातानंतर त्यांचे मृतदेह मंगळवारी सकाळपर्यंत रस्त्याच्या कडेला खोलगट भागात पडून होते.

विजय दयाराम सोळंके (२६) व रवि दयाराम सोळंके (३२, दोन्ही रा. वलगाव) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी ६.३० वाजता नांदगावपेठ पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली. बिझीलँड येथील प्रतिष्ठानात काम आटोपून सोमवारी रात्री ते दुचाकी (एमएच २७ बीजे-३७८१) ने वलगाव ते वाळकी मार्गाने घरी जात होते. दरम्यान, नांदगावपेठ टोल नाका ते वाळकी रोडवरील काही अंतरावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. अपघातात गंभीर जखमी होऊन ते रस्त्याच्या कडेला खोलगट भागात कोसळले. अधिक रक्तस्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात त्यांच्या दुचाकीचाही चुराडा झाला. सकाळी ६.३० वाजता काही नागरिक त्या मार्गाने रपेट करणा-यांना मृतदेह आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि दोघांचेही मृतदेह इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. पोलिसांनी अज्ञात वाहनाचालकाविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. या अपघातात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
- उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, नांदगाव पेठ

Web Title: The death of the brothers was in the driving of an unknown vehicle, and the bodies were lying on the road all night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.